Vermicompost Guide : गांडूळ खत कसे तयार करावे?

Organic Farming : सेंद्रिय शेतीत गांडूळ खताला अनन्यसाधारण महत्व आहे. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनासाठी गांडुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात.
Salam Kisan
Salam KisanAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Farmer News : सेंद्रिय शेतीत गांडूळ खताला अनन्यसाधारण महत्व आहे. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनासाठी गांडुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळ खताची निर्मिती करताना जागेची निवड, शेड, बेड किंवा खड्ड्यामध्ये योग्य थरांमध्ये पदार्थांची भरणी याकडे लक्ष दिले पाहिजे.

जागेची निवड

गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे नसावीत. कारण झाडांची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे.

छप्पर बांधणीची पद्धती

ऊन आणि पावसापासून बचाव करण्याकरिता ८ फूट उंच, १० फूट रुंद व ३० ते ४० फूट लांब, आवश्यकतेनुसार लांबी कमी जास्त चालू शकते. छपरात/शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी. सुरक्षितता नसेल तर लांबीच्या दोन्ही बाजूंना कूड घालावा.

गांडूळ खत कसे तयार करावे?

छपरामध्ये दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्यांच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा.

पहिला थर ः त्या दोन ओळीवर उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करून सहा इंच उंचीचा थर द्यावा. या जाड काडी कचऱ्यामध्ये गांडुळांना आश्रय घेता येतो.

दुसरा थर ः चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या स्लरीचा द्यावा. तो उष्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडुळांना खाद्य म्हणून कामी येईल. बीज रुप म्हणून या थरावर साधारण ३ x ४० फुटासाठी १० हजार गांडुळे समान पसरावीत.

तिसरा थर ः गांडुळे पसरल्यानंतर त्यावर कचऱ्याचा १ फूट जाडीचा थर घालावा. पुन्हा चार-पाच इंच कचऱ्याचा द्यावा. हलके पाणी शिंपडून ओल्या पोत्याने किंवा गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.

गांडुळाचे खाद्य : सर्व सजीवांप्रमाणे गांडुळाच्याही खाण्यामध्ये आवडीनिवडी असतात. त्यांच्या आवडीच्या खाद्यामध्ये गांडुळांची वाढ व प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, प्राण्यांची विष्ठा (कोंबड्यांची विष्ठा वगळता) कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडुळाचे आवडीचे आहेत.

(ॲग्रो विशेष)

Salam Kisan
Vermicompost : गांडूळ खत निर्मितीचे तंत्र

- शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुद्धा खत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रिय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळ खत तयार करता येते.

गांडूळ खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकाचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड यांचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना त्यामध्ये १:३ या प्रमाणात शेणखत मिसळणे आवश्यक आहे.

(market intelligence)

गांडूळ खाद्य नेहमी बारीक करून टाकावे.

-बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते.

खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्याअगोदर गांडूळ खाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे. म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल.

सूक्ष्म जिवाणू संवर्धके (बॅक्टेरीयल कल्चर) वापरून खत कुजविण्याच्या प्रक्रियेस वेग देता येतो. त्यासाठी १ टन खतास अर्धा किलो जिवाणू संवर्धके वापरावीत.

-----------

माहिती आणि संशोधन - प्रशांत नाईकवाडी

(An initiative by Salam Kisan.)

(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com