Kolhapur Students
Kolhapur Studentsagrowon

Kolhapur Students : कोल्हापूरच्या पोरांचा नादखुळा, पालापाचोळ्यापासून केली गांडूळ खत निर्मिती

Faming Kolhapur : शेतातील पालापाचोळा पेटवण्यापेक्षा तो कुजवून पर्यावरणपूरक खत निर्मिती करावी, असा संदेश त्यांनी दिला आहे.
Published on

Kolhapur Student Research : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याच्या जांबरे येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटांगणातील एका भागात पालापाचोळ्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली आहे. दीड महिन्यात शंभर किलो उत्तम खत निर्मिती झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. शेतातील पालापाचोळा पेटवण्यापेक्षा तो कुजवून पर्यावरणपूरक खत निर्मिती करावी, असा संदेश त्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाची माहिती द्यावी या - अनुषंगाने शाळा पातळीवर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. गावच्या आठशे लोकवस्तीच्या या गावातून शाळेत सुमारे दहा लाखांचा शैक्षणिक उठाव झाला आहे. इमारतीची रंगरंगोटी करण्याबरोबरच अन्य भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश - निश्चित करताना पालकांकडून रोप लावण्यासाठी कुंडी घेतली जाते. रोपांना - सेंद्रिय खत उपलब्ध करण्यासाठी गांडूळ खत निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यापक डी. एस. गोरे यांनी बेळगाव येथून खत निर्मितीसाठी बेड खरेदी केला. त्यामध्ये पालापाचोळा व शेण खताचा स्तर तयार करून त्यात गांडूळ सोडले.

नियमितपणे पाण्याची योग्य मात्रा दिली. ४५ दिवसांत १०० किलो खत निर्मिती झाली. प्रत्येकी एक किलोची पाकिटे विद्यार्थ्यांनीच तयार केली असून ती अल्प किमतीत शेतकऱ्यांना देणार असल्याचे सांगितले.

Kolhapur Students
Kolhapur Agriculture Water : कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमधील पाणी पातळी खालावली, शेतीचा पाणी प्रश्न गंभीर

विविध स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेमध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या या शाळेच्या विद्यार्थ्यांनी खत निर्मितीचा आगळा उपक्रम राबवून इतर शाळांतील विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. यासाठी अध्यापक गोरे, सुरेश तिडके, व्ही. एम. पाटील, सरपंच विष्णू गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांनी बनवलेले गांडूळ

खत शाळेतील बगीचामध्ये रोपांना वापरण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थ्यांना कृतिशील पर्यावरण शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. डी. एस. गोरे, अध्यापक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com