Grape  Agrowon
ॲग्रो विशेष

Exportable Grape : नाशिकमध्ये द्राक्षनिर्यात २५ हजार टनांनी वाढली

सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, ‘‘निर्यातीत वाहतूक भाडे कमी झाले. तर मार्च वगळता जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वातावरण चांगले होते. मागील वर्षीच्या तुलनेत वातावरण चांगले राहिल्याने अडथळे आले नाहीत.

मुकुंद पिंगळे

Nashik News : चालू हंगामात ३ एप्रिलअखेर युरोपियन देशात १ लाख ४७ हजार ४० टन तर नॉन युरोपियन देशात २८ हजार ४३९ टन द्राक्षनिर्यात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २५ हजार ६९५ टन अधिक द्राक्षनिर्यात (Grape Export) झाली आहे.

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात (Grape Production) महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागतो. त्यातील एकूण द्राक्ष निर्यातींपैकी नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के वाटा आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे काही शेतकऱ्यांनी बागा तोडून टाकल्या आहेत.

तर चालू वर्षी पुन्हा अवकाळी, वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे काही ठिकाणी द्राक्षपीक ग्रासले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष निर्यात वाढल्याचे समोर आले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात द्राक्षाचे एकूण ६२ हजार ९८२.७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात निफाड, दिंडोरी, नाशिक व चांदवड तालुक्यात सर्वाधिक लागवड आहे.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १७ हजार ८८४ हेक्टर क्षेत्रावरील ३१ हजार ८११ द्राक्ष प्लॉटची ‘अपेडा’च्या ग्रेपनेट प्रणालीत नोंदणी करण्यात आली. मागील दोन वर्षांच्या तुलनेत ही नोंदणी कमी झाली. मात्र यंदा माल तयार होण्याच्या कालावधीत अडचणी कमी राहिल्या.

मात्र ऐन काढणीच्या काळात नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. त्यामुळे मालाची प्रतवारी घसरल्याने दराला फटका बसूनही निर्यातीत वाढ दिसून आली आहे.

२०१८-१९ च्या हंगामात जिल्ह्यातून विक्रमी द्राक्षनिर्यात झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दोन वर्षे निर्यात कामकाज प्रभावित झाले. तर रशिया-युक्रेन युद्धजन्य परिस्थितीचा मागील वर्षी मोठा परिणाम दिसून आला.

मात्र चालू वर्षी पुन्हा निर्यातीत आश्‍वासक स्थिती पाहायला मिळाली आहे. युरोपात सर्वाधिक निर्यात नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, युके येथे तर नॉन-युरोपीय देशांमध्ये रशिया, यूएई, कॅनडा, तर्की, चीन या देशांत निर्यात झाली आहे.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, ‘‘निर्यातीत वाहतूक भाडे कमी झाले. तर मार्च वगळता जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वातावरण चांगले होते. मागील वर्षीच्या तुलनेत वातावरण चांगले राहिल्याने अडथळे आले नाहीत.

त्यामुळे निर्यात वाढली. सुरुवातीला दर चांगले मिळाले. मात्र अलीकडे ते घसरले आहेत. दरवर्षीप्रमाणे मार्चअखेर दर कमी झाले आहेत. फेब्रुवारी अखेरचे माल पोहोचू लागतात. त्यांनतर मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याचा हा परिणाम असतो.

१२ युरोवरून १० ते १०.५० युरोवर खाली आले आहेत. आताचा माल गेल्यास मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात माल अधिक असेल. तर मेच्या तिसऱ्या सप्ताहात इजिप्त येथील माल सुरू होईल. त्याचा परिणाम दरावर असेल.’’

गेल्या पाच वर्षांतील निर्यात स्थिती : (३ एप्रिलअखेर)

प्लॉट - २०१८-१९ - २०१९-२०- २०२०-२१- २०२१- २२- २०२२-२३

ग्रेपनेट प्रणाली द्राक्ष नोंदणी (संख्या) - ३८,४७८- २८,३८२- ३७,५५७- ३४,२९५ - ३१,८११

द्राक्ष प्लॉट नोंदणी क्षेत्र (हेक्टर) - २४,६२५ - १८,१६४ - २४,०५५ - २१,९५०- १७,८८४

नोंदणी केलेले तालुके -१३- १३ - १३- १३ - १३

निर्यात (टन) - १,४६,११३ - १,१६,७६७- १,२६,९१२- १,०७,४८४- १,३३,१७९

गेल्या दोन वर्षांतील तुलनात्मक स्थिती (१ नोव्हेंबर ते ३ एप्रिलदरम्यान)

वर्ष- युरोपीय देश - नॉन युरोपीय देश

२०२१-२२ - ८५,३४४.४९ - २७१६९

२०२२-२३- १,०४,७४० - २८,४३९

निर्यात झालेल्या प्रमुख जाती

सफेद : थॉमसन सीडलेस, सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका, तास-ए-गणेश

रंगीत : शरद सीडलेस, क्रीमसन सीडलेस,मेडिका.

गारपिटीमुळे कामकाज अस्थिर

जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक पट्ट्यात ७ ते १२ एप्रिल या कालावधीत वादळी पावसामुळे द्राक्ष मालाला तडे गेले. काढणी केलेल्या मालाची प्री कुलिंग प्रक्रिया केल्यानंतर तो खराब होत आहे. त्यामुळे कामकाज अस्थिर झाले, असे द्राक्ष निर्यातदार मधुकर क्षीरसागर यांनी सांगितले.

१ ते १५ ऑक्टोबरदरम्यान छाटलेल्या बागा अधिक होत्या. या मालाची काढणी मार्चमध्ये होणार होती. मात्र काढणीच्या काळात गार वारे, पाऊस, गारपीट यामुळे मालाचे नुकसान झाले. त्यामुळे दरावरही परिणाम झाला. मात्र गुणवत्तेनुसार चांगले दर आहेत. सफेद वाणाला ४५ ते ८० रुपये तर रंगीत वाणात ७० ते ११० दरम्यान प्रतिकिलो दर मिळाला.
बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड
चालू वर्षी निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी कमी झाली. मात्र निर्यातक्षम माल तयार झाल्यामुळे यंदा निर्यात वाढल्याचे दिसून येते.
कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT