Ahilyanagar News: स्वीकृत नगरसेवकपदी नेत्यांचे नातेवाईक, जवळचे कार्यकर्ते यांची वर्णी लागत होती. मात्र आता नगरविकास विभागाने स्वीकृत नगरसेवक निवडीचे निकष जाहीर केले आहेत. यामुळे नेत्यांना नातेवाइकांची वर्णी लावणे अवघड झाले आहे. त्यामुळे नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींच्या ज्ञानाचा शहर विकासासाठी फायदा होण्यासाठी स्वीकृत नगरसेवक घेण्याची तरतूद नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम आणि मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमामध्ये करण्यात आली आहे. निर्वाचित पालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या १० टक्के किंवा ५ यापैकी जी कमी असेल त्या संख्येएवढे स्वीकृत नगरसेवक निवडण्याची तरतूद आहे..Local Body Elections: भूम तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसणार?.राजकीय नेते कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावत होते. मुलगा, मुलगी, सून, जावई हे प्राधान्याने या जागेचा ताबा मारत होते. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील, जवळचे कार्यकर्तेही स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून पालिका सभागृहात जात होते. नगरपालिका- महानगरपालिका अधिनियमातील मूळ तरतुदींना हरताळ फासला जात होता. नगरविकास विभागाचे उपसचिव ए. एस. जीवने यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार स्वीकृत नगरसेवकपदासाठी नगरपालिका- महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत..पाच वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर, निवृत्त प्राचार्य, वकील, इंजिनिअर, निवृत्त अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यापैकी ५ जणांचीच स्वीकृत सदस्यमधून निवड करता येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगरला ६८, श्रीरामपूरला ३४, संगमनेरला ३०, शेवगावला २४, देवळाली प्रवराला २१, जामखेडला २४, कोपरगावला ३०, नेवासेला १७, पाथर्डीला २०, राहत्याला २०, राहुरीला २४, श्रीगोंदेला २२, व शिर्डीला २३ नगरसेवक आहेत. जिल्ह्यातील एकूण नगरसेवकांची संख्या पाहता सुमारे २५ स्वीकृत नगरसेवक जिल्हाभरात नियुक्त केले जाणार आहे..Local Body Elections: कोल्हापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सवतासुभा.स्वीकृत नगरसेवकासाठीचे निकषमान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभवशिक्षणतज्ज्ञ म्हणून पाच वर्षांचा अनुभव.निवृत्त प्राध्यापक, प्राचार्यसनदी लेखापाल म्हणून पाच वर्षांचा अनुभव.पाच वर्षांचा अनुभव असलेला अभियांत्रिकी पदवीधारकअभिवक्ता किंवा राज्यात ५ वर्षे विधी क्षेत्राचा अनुभवी व्यक्तीमुख्याधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त पदावरून सेवानिवृत्तनोंदणीकृत समाजाधिष्ठित संस्थेत ५ वर्षे पदाधिकारी कामाचा अनुभव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.