Pune News: निसर्गाला मानवी स्वार्थापासून वाचविण्यासाठी आयुष्यभर झटणारे...पर्यावरण रक्षणाला चळवळीचे रूप देणारे संवेदनशील व जागतिक ख्यातीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ (वय ८३) काळाच्या पडद्याआड गेले. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन चळवळीचे द्रष्टे मार्गदर्शक आणि विज्ञानाला सामाजिक जाणिवांची जोड देणाऱ्या डॉ. गाडगीळ यांचे बुधवारी रात्री उशिरा पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. .त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने देशाच्या पर्यावरणीय विश्वातील केवळ एक व्यक्ती नव्हे, तर पर्यावरणीय चळवळीला दिशा देणारा दूरदृष्टीचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना समाजातील सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे..Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ८३ व्या वर्षी निधन.डिसेंबरच्या सुरुवातीला घरात घसरून पडल्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागला होता आणि पायाचे हाड मोडले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना घरी आणण्यात आले, मात्र डिसेंबरच्या अखेरीस त्यांना त्रास होऊ लागल्याने पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले..उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, जावई, सून आणि नाती असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुलोचना गाडगीळ यांचे गेल्या वर्षी जुलैमध्ये निधन झाले होते..Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्र संघाचा पुरस्कार जाहीर.डॉ. माधव गाडगीळ हे थोर भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि नियोजनकार डॉ. धनंजय गाडगीळ यांचे पुत्र होते. डॉ. गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ मध्ये पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न विद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी आणि मुंबईतील भारतीय विज्ञान संस्थेतून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले..हावर्ड विद्यापीठातून ‘गणितीय पर्यावरणशास्त्र’ (मॅथेमॅटिकल इकॉलॉजी) विषयात त्यांनी पीएच.डी. मिळवली. हावर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणक केंद्राचे आणि उपयोजित गणित शास्त्रशाखेचे ते फेलो आहेत. १९७३ ते २००४ पर्यंत डॉ. गाडगीळ बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) प्राध्यापक होते. त्यांनी तेथे ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. हावर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत. याशिवाय अमेरिकेतील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते..River Pollution : धनदांडग्यांचे प्रदूषण लपविण्यात प्रदूषण मंडळाच्या यंत्रणा गुंतल्या ; डॉ. माधव गाडगीळ यांचा आरोप ; पहिला राम नदीसेवक पुरस्काराचे वितरण.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१०मध्ये पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डॉ. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून २०११मध्ये पश्चिम घाटासंदर्भातील अहवाल केंद्र सरकारसमोर सादर केला. हा अहवाल पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मैलाचा दगड मानला जातो..या अहवालात डॉ. गाडगीळ यांनी पश्चिम घाटात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) तयार करण्याची आणि खाणकाम, उत्खनन यांसारख्या हानिकारक प्रकल्पांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यामुळे या अहवालावर व्यापक चर्चा झाली आणि त्याला विरोधही झाला. त्यानंतर केंद्र सरकारने डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमली होती..Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन .डॉ. गाडगीळ यांनी जैवविविधता संवर्धन, लोकसहभागातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयांवर मोलाचे संशोधन आणि लेखन केले आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लोकसहभाग असायला हवा, यासाठी त्यांनी जनचळवळ उभी केली आणि लोकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून द्यावे, यासाठी सोप्या मराठीत त्यांनी विपुल लेखन केले..डॉ. गाडगीळ यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील पर्यावरणविषयक मुद्द्यांवर डॉ. गाडगीळ यांनी दिलेल्या योगदानाची दखल संयुक्त राष्ट्राने देखील घेतली. डॉ. गाडगीळ यांना २०२४ मध्ये ‘यूएनईपी’च्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..‘‘सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत डॉ. माधव गाडगीळ यांचा प्रवास हावर्ड विद्यापीठाच्या सभागृहांपासून ते भारत सरकारच्या उच्चपदापर्यंत झाला. पण या संपूर्ण प्रवासात डॉ. गाडगीळ यांनी स्वतःला ‘जनतेचा वैज्ञानिक’च मानले’’, अशा शब्दांत ‘यूएनईपी’ने डॉ. गाडगीळ यांना गौरव केला आहे. डॉ. गाडगीळ यांच्या जाण्याने देशाच्या पर्यावरणीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, लोकसहभागातून पर्यावरणीय चळवळीला दूरदृष्टी देणारा दिशादर्शक हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.