Residue Grape Production : उद्योग सांभाळत तयार केला 'रेसिड्यू फ्री' द्राक्षांचा 'माई फार्म' ब्रँड

Team Agrowon

राकेश काटकर यांनी आपला पुण्यातील व्यवसाय सांभाळत रेसिड्यू फ्री द्राक्षांची शेती केली आहे. या द्राक्षांच्या विक्रीसाठी त्यांनी माई फार्म या ब्रँडअंतर्गत विक्रीची व्यवस्थाही उभारली आहे.

Residue Free Grape Production | Sudarshan Sutar

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यातील खुपसंगी आणि पंढरपुरातील करकंब येथे मिळून राकेश यांची एकूण ८० एकर शेती आहे. त्यात सर्वाधिक ५० एकरांवर आठ प्रकारच्या वाणांची द्राक्ष बाग आहेत.

Residue Free Grape Production | Sudarshan Sutar

द्राक्षाच्या शेतीच्या सिंचनासाठी विहीर आणि शेततळ्याचीही व्यवस्था राकेश यांनी केली आहे.

Residue Free Grape Production | Sudarshan Sutar

शेतीची यापूर्वीचा फारसा अनुभव व माहिती नसताना राकेश यांनीच शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

Residue Free Grape Production | Sudarshan Sutar

त्यातूनच आईच्या नावे ‘माई फार्म’ हा ब्रॅण्ड तयार करून दोन किलो आकर्षक बॉक्स पॅकिंगमधून द्राक्षांची पुणे येथे थेट विक्री व्यवस्था उभारली.

Residue Free Grape Production | Sudarshan Sutar

राकेश सुमारे ५० एकरांवर द्राक्ष बाग घेत आहेत. त्यात आरके व सुपर सोनाका प्रत्येकी चार एकर, एसएसएन व अनुष्का प्रत्येकी पाच एकर, माणिकचमन २० एकर, क्लोन २० एकर, फ्लेम सीडलेस दोन व कृष्णा सीडलेस अर्धा एकर अशी वाणांची विविधता ठेवली आहे.

Residue Free Grape Production | Sudarshan Sutar

व्हर्मिवॅाश, गांडूळ खत आणि जैविक स्लरीच्या वापरावर विशेष भर दिला आहे. गांडूळ खताचे सुमारे १९ बेड्‍स आहेत. त्याद्वारे व्हर्मिवॉशही मिळते.

Residue Free Grape Production | Sudarshan Sutar
Banana Farming | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...