Jute Export  Agrowon
ॲग्रो विशेष

Jute Export : तागाची १७७ हजार टन निर्यात

Jute Market : गेल्या आर्थिक वर्षात (२०२३) १७७ हजार टन तागाची (ज्यूट) निर्यात विविध देशांना झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील ही सर्वाधिक निर्यात आहे. गेल्या वर्षी अमेरिका, इंग्लंडमध्ये बहुतांशी तागाची निर्यात झाली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : गेल्या आर्थिक वर्षात (२०२३) १७७ हजार टन तागाची (ज्यूट) निर्यात विविध देशांना झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील ही सर्वाधिक निर्यात आहे. गेल्या वर्षी अमेरिका, इंग्लंडमध्ये बहुतांशी तागाची निर्यात झाली. या देशांबरोबरच ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, इजिप्त, जर्मनी, इटली, जपान, सौदी अरेबिया आणि तुर्की या देशांनाही तागाला मागणी होती.

बांगलादेशातून सर्वाधिक प्रमाणात तागाची निर्यात जगातील देशांना होते. बांगलादेशानंतर तागाच्या निर्यातीत भारताचा क्रमांक लागतो. गेल्यावर्षी ३००० हजार कोटी रुपयांच्या तागाची निर्यात झाली. यंदा यात ५०० कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम बंगाल हे भारतातील सर्वांत मोठे ताग उत्पादक राज्य आहे. त्यानंतर आसाम आणि बिहारचा क्रमांक लागतो. सूत, कार्पेट, बॅकिंग कापड, ब्लँकेट्स, डेकोरेटिव्ह फॅब्रिक्स, फ्लोअर कव्हरिंग्ज, शॉपिंग बॅग, सॅकिंग आणि फूड-ग्रेड ज्यूट कापड यासह विविध उत्पादने तयार करण्यासाठी तागाचा वापर केला जाऊ शकतो.

निर्यातीत वाढ होत असली तरी सध्या पश्‍चिम बंगाल व आसाममध्ये पुरामुळे हाहाकार उडाल्याने याचा विपरीत फटका पुढील वर्षाच्या ताग उत्पादनाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुरामुळे यंदा तागाच्या उत्पादनात वीस टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. सुरू पिकाचे तर नुकसान झाले आहेच पण पुढील लागवडीवरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे राष्ट्रीय ज्यूट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय जूट बोर्ड जूट टेक्नॉलॉजी मिशन २.० या नवीन योजनेवर काम करत आहे. या अंतर्गत तागाच्या वाढीसाठी विविध उपक्रमावर भर दिला जात आहे. निर्यात वाढविण्याबरोबर विविध भागधारकांशी चर्चा करुन तागाच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

तागापासून इथेनॅाल निर्मितीसाठीही प्रयत्न

ताग वनस्पतीपासून इथेनॉल निर्मिती करण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास इथेनॉल निर्मितीसाठी तागांची उपयुक्तता सिद्ध होऊन इथेनॉल निर्मितीसाठी ताग हा आणखी एक कच्चा माल म्हणून पुढे येवू शकेल, असा अंदाज आहे. तागापासून इथेनॅाल करण्यासाठी पायलट युनिटही उभारण्याचे प्रयत्न केंद्र स्तरावरून सुरू आहेत.

गेल्या दहा वर्षांतील निर्यात अशी (हजार टन)

वर्ष निर्यात

२०१४ १६९

२०१५ १५७

२०१६ १५५

२०१७ १३९

२०१८ १५२

२०१९ १२१

२०२० ११३

२०२१ १०२

२०२२ १६१

२०२३ १७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT