Drip Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Drip Irrigation : ठिबक ‘ऑटोमेशन’साठी तज्ज्ञ समिती स्थापन

Irrigation Scheme : राज्याच्या बागायती शेतीला वरदान ठरलेल्या सूक्ष्म सिंचनात स्वयंचलित प्रणालीचा (ऑटोमेशन) विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या बागायती शेतीला वरदान ठरलेल्या सूक्ष्म सिंचनात स्वयंचलित प्रणालीचा (ऑटोमेशन) विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कृषी आयुक्तालयाने तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेत आता ‘प्रति थेंब अधिक पीक योजने’च्या अंतर्गत ठिबक संचात ‘ऑटोमेशन’ प्रणाली बसविण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आलेला आहे. ऑटोमेशनसाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये अनुदान मिळणार असून, त्यासाठी कमाल मर्यादा लावण्यात आलेली नाही.

फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांच्या म्हणण्यानुसार, राज्य शासनाने ऑटोमेशन व अनुदान याच्या तांत्रिक रूपरेषा ठरविण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. शेतकऱ्यांना ऑटोमेशनसाठी अनुदान मिळण्याकरिता सरकारी यंत्रणेने केलेले धोरणात्मक बदल खूप मोलाचे आहेत. कारण, भविष्यात पाण्याची आणि मजुरांची तीव्र टंचाई भासेल. अशावेळी ऑटोमेशनवर चालणारी सूक्ष्म सिंचन प्रणाली सर्वांत उपयुक्त ठरणार आहे.

तज्ज्ञ समितीचे अध्यक्षपद फलोत्पादन सहसंचालक अशोक किरनळी यांच्याकडे देण्यात आलेले आहे. समितीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कवठे येथील शेतकरी राजेंद्र डेरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

समितीत चारही कृषी विद्यापीठांमधील कृषी अभियांत्रिकी तसेच कृषी विद्यावेत्ता विभागाच्या प्रमुखांना स्थान देण्यात आलेले आहे. याशिवाय जैन इरिगेशन, नेटाफिम इरिगेशन, कोठारी ॲग्रीटेक, रिवूलिस इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या तांत्रिक प्रतिनिधींचा समावेश करण्यात आलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT