District Development Plan Agrowon
ॲग्रो विशेष

District Development Plan : छत्रपती संभाजीनगर जिल्हा विकास आराखड्यासाठी कार्यकारी समितीची बैठक

District Development Plan Sambhaji Nagar: जिल्हा विकास आराखडा’’ तयार करणे व त्याला गुणात्मक साह्य देण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : ‘‘जिल्हा विकास आराखडा’’ तयार करणे व त्याला गुणात्मक साह्य देण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली.

जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे. या अनुषंगाने पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक नुकतीच जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली.

या बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जनार्दन विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, एमआयटीचे संचालक संजय देशमुख, वि उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी यांनी ‘‘जिल्हा विकास आराखडा’’ तयार करण्यासाठीच्या बैठकीची पार्श्‍वभूमी विशद केली. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सविस्तरपणे मांडल्या.

पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, की जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करताना तालुका व गावपातळीवर आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीं विचारात घेऊन योजनांचा आराखडा सादर करावा.

मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेशी सामंजस्य करार...

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले, ‘जिल्हा विकास आराखडा’ तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून ग्रामोद्योग शिक्षण मंडळ संचलित ‘‘मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेसोबत ‘सामंजस्य करार’ देखील करण्यात आला आहे.

सर्व संबंधित कार्यान्वयन यंत्रणांनी त्यांचेशी संबंधित योजनांचा “जिल्हा विकास आराखडा” तयार करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावेत. यासाठी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेने त्यांचे कार्यालयातील एका अधिका-याची “नोडल अधिकारी” म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचना केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT