District Development Plan : जिल्हा विकास आराखड्यासाठी माहिती देण्याचे आवाहन

जिल्हा विकास आराखड्यासाठी (डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन) सर्व संबंधित विभागांनी सर्वंकष बाबींचा समावेश करत माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश नियोजन उपायुक्त संजय कोलगणे यांनी दिले.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Pune Development News : जिल्हा विकास आराखड्यासाठी (डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन) सर्व संबंधित विभागांनी सर्वंकष बाबींचा समावेश करत माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश नियोजन उपायुक्त संजय कोलगणे यांनी दिले.

पुणे जिल्ह्याचे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२३ चे प्रकाशन वेळेत होण्याकरिता संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय आयुक्त कार्यालयाचे उप आयुक्त (नियोजन) संजय कोलगणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२) झाले.

त्या वेळी जिल्हा विकास आराखड्याबाबतही चर्चा झाली. बैठकीस अर्थ व सांख्यिकी संचालनालय, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक हणमंत माळी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक संजय मरकळे आदी उपस्थित होते.

Rural Development
Chandrakant Patil : पुणे जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर

या वेळी जिल्हा विकास आराखड्याबाबत उप-आयुक्त(नियोजन) श्री. कोलगणे आणि जिल्हा नियोजन अधिकारी श्री. इंदलकर यांनी माहिती देत सादरीकरण केले. हा आराखडा तयार करतानाच्या विविध महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती दिली.

यामध्ये डिस्ट्रिक्ट फॅक्ट शीट तयार करणे; त्याअनुषंगाने बलस्थाने, कमकुवतपणा, संधी आणि धोके अशा पद्धतीचे (एस.डब्ल्यू.ओ.टी.) विश्‍लेषण करण्यात यावे. आपापल्या विभागाच्या क्षेत्रातील विविध भागधारक शोधून व त्यांचा सहभाग आराखडा तयार करताना घेणे, महत्त्वाची ३ ते ४ क्षेत्र शोधून व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे आदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रामुख्याने जिल्ह्याचा विकास आराखडा जून २०२३ पर्यंत नियोजन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण करावयाचा असून, जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने शासनास सादर करावयाचा आहे, सांगण्यात आले. या आखाड्यास राज्यस्तरीय कार्यकारी समितीपुढे ठेवून नंतर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीमध्ये मान्यता देण्यात येणार आहे.
किरण इंदलकर, जिल्हा नियोजन अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com