Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bill : पाणीपट्टीतून मुळा-मुठा तिरावरील गावे वगळा

Latest Agriculture News : . ही मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने कृती समिती अध्यक्ष बापूसाहेब पठारे, सचिव अंकुश कोतवाल यांनी दिला आहे.

Team Agrowon

Pune News : हवेली तालुक्यातील मुळा- मुठा तीरावरील हिंगणागव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, भवरापूर, अष्टापूर, शिंदेवाडी, शिरसवडी, बिवरी, वाडे बोल्हाई, कोरेगाव मूळ, पेठ, नायगाव, थेऊर, मांजरी बु., मांजरी खुर्द, प्रयागधाम, कोलवडी साष्टे, केसनंद या गावातील उपसा जलसिंचन कृषी पंपाची पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदनातून केली आहे. ही मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने कृती समिती अध्यक्ष बापूसाहेब पठारे, सचिव अंकुश कोतवाल यांनी दिला आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे खडकवासला धरणातून संबंधित गावांना स्वच्छ पाणी द्यावे शेतकरी पाणीपट्टी देण्यास तयार आहे. अन्यथा, मीटरही नको, पाणी पट्टीही नको, दूषित, घाण, रासायनिक, केमिकल असलेल्या पाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा. २०२१ ते २०२३ या तीन वर्षात ६०.१०० टीएमसी पाणी जलसंपदा विभागाने पुणे महानगर पालिकेला देऊन रुपये दोनशे अठ्ठावीस कोटी नव्वद लाख चौसष्ट हजार नऊशे सव्वीस रुपये मात्र पाणीपट्टीचा मोबदला म्हणून घेतला आहे.

ज्या पाण्यावर पाणीपट्टी मोबदला घेतला तेच दूषित टाकाऊ घाण पाणी ड्रेनेजमधून नदीत सोडले जाते व त्याच पाण्यावर पुन्हा जलमापक यंत्र लावून दुसऱ्यांदा पाणीपट्टी आकारणी करणे म्हणजे शेतकऱ्यांची कुचंबना व दिशाभूल करून खिसा कापण्याचाच प्रकार आहे.

मैला, सांडपाण्यामुळे बारामाही वाहणारी मुळा-मुठा व त्यावर बसलेले कृषी पंपाद्वारे घाण पाणी शेतात वापरल्याने जमिनी नापीक, पिकण्यास अयोग्य झाल्या असून, शेती उद्योग धोक्यात आला आहे. मैलापाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न गंभीर उपसा जलसिंचनाद्वारे शेतात येणारे पाणी व त्याचा निचरा विहिरी, बोअरवेल अशा ठिकाणी होत असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे.

त्यामुळे कोणत्याही गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना नदीपात्राच्या जवळपास होऊ शकल्या नाहीत. दूषित पाण्यामुळे शरीराचे आजार विकार, त्वचारोग असे गंभीर आजारात वाढ होत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढून पर्यावरण दूषित झाले आहे. जलप्रदूषणाने नदी पात्रातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २००७ ते २००९ या तीन वर्षांत राज्यातील नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासून अहवाल सादर केला होता त्यात मुळा-मुठा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असल्याचे व गटारगंगा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT