Deputy Chief Minister Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar : चालू वर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काही नवीन योजना आणल्या आहेत. या अर्थसंकल्पातून राज्यातील प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Team Agrowon

Pune News : चालू वर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काही नवीन योजना आणल्या आहेत. या अर्थसंकल्पातून राज्यातील प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘दादांचा अर्थसंकल्प विकासाचा’ या गौरव अंकाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, प्रदेश राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक रणजित तावरे, संचालक प्रविण शिंदे, संचालक भालचंद्र जगताप, बँकेचे मुख्य कार्यकारी अ़धिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘मी पहिल्यांदा २०११ मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. या वेळी दहावा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली.’ कल्याणकारी राज्याची संकल्पना राबविताना राज्य स्थितीत राहावे, हा प्रयत्न केला. मी ज्या ज्या संस्थांवर काम केले आहे, त्या त्या ठिकाणी आर्थिक शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला. डॉ. गितांजली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी आभार मानले.

वर्षभरात ५० हजारांहून अधिक रक्कम मिळणार

राज्यातील अल्प अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या घरात वर्षभरात पन्नास हजारांपेक्षा जास्त पैसे येणार आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान योजनेतून राज्याचे ६ हजार व केंद्राचे ६ हजार असे १२ हजार, माझी लाडकी बहीण योजनेतून घरात दोघी लाभ घेणाऱ्या असतील तर १८-१८ हजार असे ३६ हजार, वीजबिल माफीचे १० हजार व तीन सिलिंडर गॅसचे दोन हजार पाचशे असे ६० हजार रुपये घरात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT