Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : तीन महिने उलटूनही प्रकल्प कोरडेच

Water Storage : पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी समाधानकारक स्थिती दिसून येत नाही. मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण २२६ प्रकल्पांत बुधवारअखेर (ता. २८) केवळ ३५.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती अजूनही समाधानकारक झालेली नाही. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी समाधानकारक स्थिती दिसून येत नाही. मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण २२६ प्रकल्पांत बुधवारअखेर (ता. २८) केवळ ३५.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

अद्यापही १४४ प्रकल्पांतील पाणीसाठा ५० टक्केंच्या आतच आहे. उरलेल्या मान्सून कालावधीत तरी हे प्रकल्प भरतील का? असा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण २२६ प्रकल्पांत अद्यापपर्यंत केवळ ३५.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

मध्यम तीन तर लघु ३७ प्रकल्प असे एकूण ४० प्रकल्प पूर्ण भरले असले तरी अजूनही ४७ प्रकल्प जोत्याखाली, तर ६ प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे अजूनही पाणीसाठ्याची चिंता मिटली नसल्याची स्थिती आहे. एकमेव मोठ्या सीना कोळेगाव प्रकल्पात अद्यापही केवळ ४.३८ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर मध्यम १७ प्रकल्पांत ३८. ६७ टक्के, २०८ लघू प्रकल्पांत ४०.६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

शंभर टक्के भरलेले ४० प्रकल्प

तेरणा, बाणगंगा, संगमेश्वर, करजखेडा, वडाळा, आळणी, राघुचीवाडी, पोहणेर, वलगूड ला.पा, वलगूड सा.त, आंबेजवळगा, खेड, येरमाळा, चोराखळी, मलकापूर, येडेश्वरी, कुंथलगिरी, आरसोली, नांदगाव, वाकवड, गिरलगाव, घुलेवाडी, बोरगाव, मांडवा, तिंत्रज, तांबेवाडी, कामठा, सांगवी काटी, पळस निलेगाव, तामलवाडी, अपसिंगा, सलगरा, वाणेगाव, गुरटा, व्होर्टी, कोळसूर, तलमोमवाडी, भिकार सांगवी, दगड धानोरा, हिप्परगा.

सर्वांत मोठ्या सीना कोळेगावची स्थिती चिंताजनक

जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या सीना कोळेगाव प्रकल्पात अद्यापही केवळ ४.३८ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठा ६५.०६० दशलक्ष घनमीटर झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा केवळ ३.९१७ दशलक्ष घनमिटर आहे. उरलेल्या मान्सून कालावधीत हा प्रकल्प भरणार का? हा प्रश्न आहे. या प्रकल्पावर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील सरासरी दहा साखर काऱखाना क्षेत्रातील ऊस पीक अवलंबून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT