Water Storage : एका आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांनी टाकली कात

Water Stock : या प्रकल्पांतील पाणीसाठा आता एकूण २०५.८८ दलघमीवर झाला आहे. आजवर कोरडे असलेल्या खडकपूर्णाच्या साठ्यातही वाढ झाली.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon
Published on
Updated on

Buldana News : ऑगस्टमधील पाऊस जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी फायदेशीर ठरला आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे ५२ प्रकल्पांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. या प्रकल्पांतील पाणीसाठा आता एकूण २०५.८८ दलघमीवर झाला आहे. आजवर कोरडे असलेल्या खडकपूर्णाच्या साठ्यातही वाढ झाली. या प्रकल्पात १८.७४ टक्के जलसाठा बनला आहे. ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे.

जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी हे तीन प्रमुख प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये वर्तमान स्थितीत ३५ टक्के जलसाठा असून, जलसाठा ७७.५९ दलघमी एवढी झालेला आहे. सात मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या ९२.८४ दलघमी जलसाठा असून, गत आठवड्याच्या तुलनेत त्यात २०.३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ४१ लघु प्रकल्पांमध्ये ३५ दलघमी जलसाठा आहे.

Dam Water Storage
Water Storage : सात मध्यम प्रकल्पांत केवळ ४४ टक्के पाणी

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात २० ते २४ ऑगस्टदरम्यान दमदार पाऊस पडला होता. या पावसाने प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावल्याने जिल्ह्यातील जलसाठे हे किमानपक्षी निम्म्या क्षमतेपर्यंत पोहोचले आहेत. अजून पावसाचा एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्यास हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरू शकतील.

प्रामुख्याने खडकपूर्णा या मोठ्या प्रकल्पात यंदा ऑगस्टमध्ये साठावाढ होऊ लागलेली आहे. हा प्रकल्प गेले अनेक महिने कोरडा पडलेला होता. प्रकल्प क्षेत्रात गेल्या काळात पाऊस झाल्याने ही वाढ होऊ लागली. मात्र, ऑगस्ट संपायला आलेला असतानाही हा प्रकल्प २५ टक्क्यांच्या आत आहे. उर्वरित ७५ टक्के साठा होऊन धरण पूर्णतःभरण्यासाठी मोठी पाऊस त्या भागात झाला तरच हे शक्य होऊ शकेल.

Dam Water Storage
Water Storage : जळकोट तालुक्यात नऊ साठवण तलावांत शंभर टक्के पाणीसाठा

जलसाठ्याची टक्केवारी

मोठ्या प्रकल्पांपैकी काही दिवसांपूर्वी शून्य टक्के साठा असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात आज १९.८८ दलघमी साठा बनलेला आहे. या प्रकल्पाची क्षमता ९३.४० दलघमी आहे. या तुलनेत सध्या २१.२८ टक्के साठा झालेला आहे. तर नळगंगा ४०.१८ टक्के, पेनटाकळी ४५.४८ टक्के, असा या तीन प्रकल्पांत एकूण ३५ टक्के जलसाठा आहे.

तर मध्यम प्रकल्पांपैकी ज्ञानगंगा ७०.४५ टक्के, मस १०० टक्के, कोराडी २६.९२ टक्के, पलढग १००, मन ५७.४० टक्के, तोरणा ६२.२३ टक्के, उतावळी ८२.२१ टक्के अशा सात प्रकल्पांमध्ये ६८.२१ टक्के जलसाठा आहे. तर ४१ लघु प्रकल्पांमध्ये एकूण १७.९५ टक्के जलसाठा असून अशा प्रकारे जिल्ह्यातील ५२ प्रकल्पांमध्ये ४३.९९ टक्के जलसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com