Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शासनाने रक्कम दिल्यानंतरही विमा कंपनीकडून वितरण नाही

Crop Insurance Compensation : आंबिया बहाराचा संत्रा नुकसानीचा हवामान आधारित फळपीक विमा मंजूर करण्यात आला असला तरी विमा कंपनीने मात्र शेतकऱ्यांना परतावे दिलेले नाहीत.

Team Agrowon

Amaravati News : आंबिया बहाराचा संत्रा नुकसानीचा हवामान आधारित फळपीक विमा मंजूर करण्यात आला असला तरी विमा कंपनीने मात्र शेतकऱ्यांना परतावे दिलेले नाहीत.

२०२३-२४ मधील हा परतावा असून राज्य सरकारने विमा रक्कम विमा कंपनीस वितरित केल्यानंतरही परतावे मात्र देण्यात न आल्याने संत्रा उत्पादक चांगलेच संतापले असून त्यांना आता आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२३-२४ मध्ये संत्रा फळपिकासाठी हवामान आधारित फळपीक विम्याचे ट्रिगर लागू झाले आहेत. राज्य शासनाने २०२३-२४ मध्ये आंबिया बहाराचे झालेल्या नुकसानीपोटी ३४४.५९ कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा केले आहेत. सहा महिने झाले असतानाही विमा कंपनीने अद्यापही परतावे दिलेले नाहीत.

गतवर्षीच्या हंगामात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले असताना यंदाही अतिपावसाने संत्र्याचे नुकसान झाले आहे. यासोबतच कोणतेच शेतपीक घरात आलेले नाही. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली असून दिवाळीचा सणही साजरा करणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.

गुरुवारी शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती विशद केली. विमा कंपनीस तातडीने परतावे देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करीत निवेदन सादर केले. दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. यावेळी रघुनाथ बिजवे, अनिल ढोले, संजय गुर्जर, मंगेश वांगे, देवानंद लांडे, प्रसाद पेठे, प्रदीप लाडोळे यांच्यासह संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

विमा कंपनीकडून प्रतिसाद नाही

शासनाने विमा रक्कम जमा केली असली तरी कंपनीने ती अद्यापही शेतकऱ्यांना वितरित केली नाही. २४ सप्टेंबर २०२४ ला यासंदर्भातील शासन अध्यादेश निघाला आहे. मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांना कंपनीचे अधिकारी काहीच उत्तर देत नाहीत. त्याचप्रमाणे कृषी आयुक्तालयातूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT