Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : परतीच्या जोरदार पावसानंतरही रायगव्हाण ‘ओव्हर फ्लो’ नाही

Agriculture Irrigation :रायगव्हाण (ता. कळंब) मध्यम प्रकल्प यंदा ‘ओव्हर फ्लो’ होण्याची शक्यता कमीच आहे. परतीच्या जोरदार पावसामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली.

Team Agrowon

Dharashiv News : रायगव्हाण (ता. कळंब) मध्यम प्रकल्प यंदा ‘ओव्हर फ्लो’ होण्याची शक्यता कमीच आहे. परतीच्या जोरदार पावसामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली. महिनाभरात प्रकल्पात ७२ टक्के पाणीसाठा झाला असून, प्रकल्पातील विविध गावांच्या योजनांसाह सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणीसाठ्या लाभ होण्याची आशा आहे.

प्रकल्पाची साठवण क्षमता १२.७० दलघमी असून, जिवंत पाणीसाठा ११.२५ दलघमी आहे. १९८७ मध्ये प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली असून, आतापर्यंत प्रकल्प पाच ते सहा वेळा पूर्णक्षमतेने भरला आहे. २०२१ मध्ये प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाला होता. २०२२ मध्ये तो अर्धाच भरला होता. गेल्या वर्षीही प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी आले नव्हते.

यंदाही प्रकल्पात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाणी आले नव्हते. अर्धा पावसाळा संपला तरी मृतसाठ्यातच पाणी होते. २४ सप्टेंबर रोजी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे एकाच दिवसात प्रकल्पात २० टक्के पाणी आले. त्यानंतर पाण्याची आवक सुरू राहिली व पाऊसही पडत गेला. यामुळे यंदा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा होऊन प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र ती फोल ठरण्याची शक्यता आहे.

२५ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पात ८.१० दलघमी पाणी असून पाण्याची आवक अजून सुरूच आहे. प्रकल्पात परिसरातील दहा गावांसाठी पाणी योजना आहे. काही वर्षांपूर्वी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा झाला. गाळमुक्त झालेले मोठ्या क्षमतेचा हा पहिलाच प्रकल्प ठरला.

त्यानंतर पाणीसाठा पुनरुज्जीवित होऊनही केवळ एकाच वेळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. ३७ वर्षांच्या काळात पाच ते सहा वेळा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्प लातूर व धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने प्रकल्पातील पाण्याचा फायदा मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यातील शेतकरी व गावांनाच होता.

यामुळे प्रकल्पात सुरुवातीला मांजरा धरणातून फिडर कालव्याची योजना मंजूर करण्यात झाली. योजनेतून मांजरा प्रकल्पातील अतिरिक्त पाणी रायगव्हाण प्रकल्पात आणण्याचे नियोजन होते. त्यानंतर ही योजना बारगळली व आता कासरा उच्चस्तरीय बंधाऱ्यातून उपसा सिंचनाद्वारे पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र या प्रयत्नांना अजून तरी यश आलेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Rate : वाशी बाजार समितीत संत्री ४० रुपये किलो

Paddy Season : भातपीक कापणी हंगामाला प्रारंभ

Animal Fodder : चारा मुबलक; माळरानातही हिरवळ

Rajewadi Water Lake : राजेवाडी तलाव भरल्याने शेतीचा पाणीप्रश्‍न निकाली

Diwali Season : दिवाळीच्या पहिल्या अंघोळीनंतर शेतकऱ्यांनी गाठले थेट शिवार

SCROLL FOR NEXT