Water Storage : नांदेडमधील पाच मोठे प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Water Stock : नांदेड पाटबंधारे मंडळातर्गत येणाऱ्या नांदेडमधील दोन, परभणी, हिंगोली व यवतमाळमधील प्रत्येकी एक असे एकूण पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड पाटबंधारे मंडळातर्गत येणाऱ्या नांदेडमधील दोन, परभणी, हिंगोली व यवतमाळमधील प्रत्येकी एक असे एकूण पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यासोबतच नांदेड पाटबंधारे विभागातील नऊ मध्यम प्रकल्प आणि ८० लघू प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. नांदेडमधील १०४ प्रकल्पात ६०१.५९ दशलक्ष घणमीटरनुसार ८२.६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे नांदेडमधील रब्बी हंगाम बहरण्याची आशा निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा जून महिन्यात समाधानकारक पावसाअभावी धरणसाठ्यात घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता. परंतु यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पात पाणीसाठा वाढायला सुरवात झाली.

Water Storage
Water Storage : नांदेडमधील प्रकल्पात ८४ टक्के पाणीसाठा

ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणीसाठा झपाट्याने वाढला. सध्या जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात ६०१.५९ दशलक्ष घणमीटरनुसार ८२.६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात १३८.५४ दलघमीनुसार ९९.६२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

चार कोल्हापुरी बंधाऱ्यात १.७५ टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पात १६७.५८ दलघमीनुसार ९६.९८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ७६.३३ दलघमीनुसार ४०.२२ टक्के पाणीसाठा आहे.

Water Storage
Water Storage : परभणी जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमध्ये ८५ टक्के जलसाठा

जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात १३८.२१ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.

यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ८०९.७७ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ८०.९६ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ९६४.१० दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com