Dilip walse patil Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : इथेनॉलमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हमखास वाढेल : वळसे-पाटील

Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२४) करण्यात आला.

Team Agrowon

Pune News :  ‘‘केंद्र शासनाच्या धोरणानुसार कारखान्यात इथेनॉल निर्मिती करण्यात येत आहे. इथेनॉल खरेदी करण्यासाठी दर निश्चिती केली असून त्यामुळे कारखान्यांचे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न हमखास वाढेल,’’ असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील केले.

पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२४) करण्यात आला. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी  सहकारमंत्री श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन करण्यात आले. यानंतर गव्हाणात मोळी सोडून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.

श्री. वळसे पाटील म्हणाले, ‘‘भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कामकाज उत्कृष्टपणे सुरू असून असेच पुढेही सातत्य कायम टिकवून ठेवावे. तसेच एफआरपी आणि साखरेचा दर ठरवताना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले जाईल.

भीमाशंकर कारखान्याने असलेला चांगला ताळेबंद टिकवून ठेवावा. परिसरात गुळाचे गुऱ्हाळ असण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. उसाच्या कमी उत्पादनामुळे यावर्षी ऊस कमी होण्याची शक्यता आहे. कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी चांगले काम करीत असून त्यांच्या अडचणी असल्यास त्या संचालक मंडळापुढे मांडाव्यात, त्या सोडविल्या जातील.’’

बाळासाहेब बेंडे म्हणाले, ‘‘कारखान्याने वीज प्रकल्पातून ६ कोटी ८० लाख युनिट वीजनिर्मिती केली. या वर्षी १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात नवे तंत्रज्ञान वापरून चांगल्या दर्जाची साखर निर्माण करणार आहोत. येत्या महिनाभरात इथेनॉल निर्मितीला सुरुवात होणार आहे. शेवटच्या शेतकऱ्याचा ऊस तोडल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT