Pune News: इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती घेत, विद्यमान यंत्रसामग्रीचा योग्य वापर करीत आणि धान्य आधारित तंत्रज्ञान स्वीकारून साखर कारखाने संपूर्ण वर्षभर कार्यरत राहू शकतात. इतकेच नव्हे तर यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि नफा अशा दोहोंत देखील मोठी वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.
प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने पुण्यात नुकत्याच एका तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी राजेश टोपे बोलत होते. इथेनॉल डिस्टिलरीजमध्ये धान्य-आधारित अॅड-ऑन मॉड्यूल्सद्वारे इथेनॉल उत्पादन विस्तारासोबतच भारतातील इथेनॉल मिश्रणाच्या वाढत्या संधींवर आणि जैवइंधन क्षेत्रातील नवकल्पनांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, प्राजच्या बायोएनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे, या उद्योगाशी संबंधी तज्ज्ञ, संस्था आणि विविध भागधारक या वेळी आवर्जून उपस्थित होते.
विद्यमान संसाधनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून धान्य-आधारित मॉड्यूल्सच्या जोडणीद्वारे इथेनॉल उत्पादन कसे वाढवता येईल, यावर या कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला होता. राजेश टोपे म्हणाले, की कचऱ्यापासून उर्जानिर्मिती ही संकल्पना पुढारलेली असून यामुळे इथेनॉल उत्पादन वाढणार आहेच शिवाय साखर कारखान्यांची आर्थिक शाश्वतता देखील सुधारेल.
नजीकच्या भविष्यात या संकल्पनेमुळे भारताच्या जैवइंधन उद्दिष्टांना गती मिळेल. परंतु योग्य किमतीत कच्चा माल उपलब्ध होणेही या कार्यक्रमाच्या यशासाठी महत्त्वाचे ठरेल. डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, की ग्लोबल बायोफ्यूएल अलायन्समुळे नव्या संधी उपलब्ध होत असताना, भारतीय डिस्टिलरीज जागतिक जैवइंधन व्यापारातील प्रमुख भागीदार बनू शकतात. प्राजमध्ये, आम्ही शाश्वत उपाय शोधण्यात आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला बळकट करण्यासाठी तसेच शेतकरी आणि उद्योगांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी पूर्णतः वचनबद्ध आहोत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.