Malegaon Sugar Factory
Malegaon Sugar FactoryAgrowon

Sugar Factory : सोलापुरातील नऊ साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ची कारवाई

Sugar Industry : थकित ‘एफआरपी’प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाईचा दणका दिला आहे.
Published on

Solapur News : थकित ‘एफआरपी’प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाईचा दणका दिला आहे. साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई करून ऊस पुरवठादारांची थकबाकी १५ टक्के व्याजासह संबंधित साखर कारखान्याकडून चुकती करुण घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील १५ साखर कारखान्यांवर ३७२.६१ कोटी रुपये थकित एफआरपीच्या वसुलीसाठी आरआरसी कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी मंजूर केले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

Malegaon Sugar Factory
Sugar Production : साखर निर्मितीत कोटींच्या उड्डाणाला ब्रेक

फेब्रुवारी अखेरीसच्या एफआरपी अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यातील नऊ कारखान्यांकडील सुमारे २६० कोटी रुपये थकित एफआरपी वसुलीसाठी आदेश देण्यात आले आहेत. ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ चे कलम ३(३) मधील तरतुदीनुसार हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाचे १४ दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे ऊसबिले ऊस पुरावठादारांना देणे प्रत्येक कारखान्यांना बंधनकारक आहे.

Malegaon Sugar Factory
Sugarcane Crushing Season : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये ऊस गाळप पूर्ण

१४ दिवसांत एफआरपी न दिल्यास विलंब कालावधीकरिता १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद असूनही कारखान्यांकडे हंगाम २०२४-२५ मधील एफआरपी थकित आहे. कारखान्यांकडील एफआरपीप्रमाणे ऊसदराची थकित रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून आरआरसीचे आदेश पारित करण्याची तरतूद आहे.

आरआरसी कारवाईचा आदेश दिलेले कारखाने

सोलापूर जिल्हा-

कारखाना आरआरसी रक्कम (कोटींत)

मातोश्री लक्ष्मी ५.८७

गोकूळ शुगर्स, धोत्री २८.३०

लोकमंगल, बिबीदारफळ १७.६१

लोकमंगल, भंडारकवठे ५०.०९

जयहिंद शुगर ४८.२८

संत दामाजी ३५.८१

सिद्धनाथ शुगर ३९.०६

इंद्रेश्‍वर शुगर २२.३५

धाराशिव, सांगोला ५.७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com