Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Production : काजूचा ३० टक्केच उत्पादनाचा अंदाज

Cashew Market : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सरासरीच्या ३० टक्केच उत्पादनाचा अंदाज आहे. उत्पादन कमी असले, तरी काजू बीचा दर ११० रुपयांवरच स्थिर आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सरासरीच्या ३० टक्केच उत्पादनाचा अंदाज आहे. उत्पादन कमी असले, तरी काजू बीचा दर ११० रुपयांवरच स्थिर आहे. यापुढे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

जिल्ह्यात या वर्षी जानेवारीपासून काजू हंगामाला प्रारंभ झाला. किनारपट्टी भाग आणि दोडामार्ग तालुक्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, तर इतर भागांत जानेवारीच्या अखेरीस हंगाम सुरू झाला.

या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये थंडीचा अभाव होता. त्यामुळे अपेक्षित पालवी आणि मोहर आला नाही. जानेवारीत थंडी पडल्यानंतर झाडांना पालवी आणि मोहर आला. त्यामुळे प्रथमच काजू हंगामाची तीन टप्प्यांत विभागणी झाली. पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील काजू हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील हंगामदेखील पुढील दहा, बारा दिवसांत आटोपण्याची शक्यता आहे.

दरवाढीची अपेक्षा फोल; काजू बीची विक्री सुरू

काजूच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. काजू बीचा दर प्रतिकिलो केवळ ११० रुपयांवरच राहिला आहे. उत्पादन कमी असल्यामुळे काजू बीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु दरात वाढ होत नसल्याने आता उत्पादक काजू बीची विक्री करू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT