Cashew Seeds : कोल्हापुरातील कोकण पट्ट्यात काजू बियांना कवडीमोल दर, शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

Kolhapur Bhudargad : भुदरगड तालुक्यातील गारगोटी, कडगाव, पिंपळगाव बाजारपेठेत काजू बी खरेदी- विक्री व्यवहार सुरू झाले आहेत.
Cashew Seeds
Cashew Seedsagrowon

Cashew Rate : भुदरगड तालुक्यातील डोंगरकपारीत काजू फळांना बहर आला आहे. यावर्षी तालुक्यातील गारगोटी, कडगाव, पिंपळगाव बाजारपेठेत काजू बी खरेदी- विक्री व्यवहार सुरू झाले आहेत. बाजारपेठेत अत्यंत अल्पदरात काजू बी विक्री होत असल्याने फळबाग उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गारगोटी बाजारात केवळ ९० रुपये प्रतिकिलो दराने काजू बी खरेदी होत असल्यामुळे फळबाग शेतकऱ्यांनी बियांचे विक्री व्यवहार पुढे ढकलले आहेत. परिणामी काजू बी खरेदी- विक्री संथपणे सुरू आहे. बाजारपेठेत काजूगरास चांगला भाव असताना बियांचा भाव घसरत असल्याने फळबाग शेतकरी अडचणीत सापडला आहे.

भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, कडगाव, फये, मठगाव, अनफ, तर दक्षिणेकडील केळेवाडी, मानवळे, भांडेबांबर, आरळगुंडी, सावतवाडी, मुरुक्टे, बेगवडे या कोकण भागात शेतकऱ्यांनी काजू फळबागा क्षेत्र वाढवले आहे.

गेली तीन वर्षे काजू बियांच्या दरात दर घसरण होत चालली आहे. काजूगराला चांगला भाव, तर काजू बी मातीमोल दराने विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन काजू उत्पादनास योग्य हमीभाव मिळत नाही तोपर्यंत विक्री व्यवहार बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे उत्पादक सांगतात. खेडोपाडी फिरता व्यवसाय करणारे व्यापारी कमी भावाने काजू खरेदी करतात.

Cashew Seeds
Cashew Rate : काजू दराचा वाद संपुष्टात, शासनाकडून काजूला १० रुपये अनुदान, बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

काटामारी करून शेतकऱ्यांची लूट करतात. गेली दोन वर्षे सुरुवातीला दर पडून राहात आहेत. उशिरा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना थोडा वाढून दर मिळाल्याचा अनुभव आहे. काजू दरवाढीसाठी शेतकऱ्यांतून सामूहिक आंदोलन झाल्यास शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळेल.

काजू उत्पादनात यावर्षी घट झालेली आहे. व्यापारी जाणीवपूर्वक दराची घसरण करीत आहेत. काजू फळबाग व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ जास्त लागते. शेतकऱ्यांनी संघटित होऊन काजूला योग्य हमीभाव मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत काजू उत्पादक शेतकरी करत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com