Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Lakdi Nimbodi Irrigation Scheme : ‘लाकडी-निंबोडी’ची पर्यावरणीय जनसुनावणी पुढे ढकलली

Agriculture Irrigation : लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेची पर्यावरणीय जनसुनावणी निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

गणेश कोरे

Pune News : लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेची पर्यावरणीय जनसुनावणी निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील १७ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उजनी जलाशयातून उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी देण्यात येणार आहे.

त्यासाठी जलसंपदा विभागाने निविदाही काढली आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने लाकडी (ता. इंदापूर) येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी (ता.३) येथील प्राथमिक शाळेत बैठक झाली. जलसंपदा विभागाच्या उजनी कालवा विभाग क्र. ८ सोलापूरतर्फे लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेअंतर्गत प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय जनसुनावणी ठेवण्यात आली होती.

मात्र लाकडी (ता. इंदापूर) येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. उद्या (ता. ५) मतदान झाल्यानंतर सुनावणी घ्यावी, अशा स्वरूपाचा अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. या बाबतची सूचना निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आदेशाद्वारे दिल्या आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा नव्याने सुनावणी घेतली जाणार आहे.

तालुकानिहाय गावांतील क्षेत्र (हेक्टर)

इंदापूर : लामजेवाडी (२३८.१), शेटफळगढे (१३८.१), म्हसोबाचीवाडी (७५६.६), निरगुडे (६६५.२) लाकडी (७४०.७), निंबोडी (४५५.५) शिंदेवाडी (५४३.८) काझड (५१३.८) वायसेवाडी (१६३.६) धायगुडेवाडी अकोले (१२२.७) : (एकूण : ४ हजार ३३८ हेक्टर)

बारामती तालुका : कटफळ (७४४.८) सावळ (९०४.९) जैनकवाडी (४७७.७) पारवडी (२०८.८)कण्हेरी (२५७.८) काटेवाडी (२१६.१ गाडीखेल (१०२.४) (एकूण २ हजार ९९३ हेक्टर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT