Irrigation Well : अकोला जिल्ह्यात खोदणार ८००० विहिरी

Irrigation Department : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ५३५ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आठ हजार २५ सिंचन विहिरींचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
Irrigation Well
Irrigation Well Agrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ५३५ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आठ हजार २५ सिंचन विहिरींचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सिंचनासाठी विहिरींची उपयोगिता अधिक आहे. पूर्वी राज्यात गावनिहाय पाच विहिरींना मंजुरी मिळत होती. योजनेसाठी निधी कमी पडायचा. अनेक ठिकाणी निधीअभावी विहिरींची कामे रखडल्याचेही समोर आले होते. परंतु त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने आता गावनिहाय विहिरींची संख्या मर्यादा वाढवली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानुसार २०२३-२४ साठी मनरेगा अंतर्गत प्रत्येक सेफ झोनमधील ग्रामपंचायतीला १५ सिंचन विहिरीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरींचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रस्तावही मागविण्यात आले आहेत. यामध्ये अकोट तालुक्यातील रेड झोनमधील १४ ग्रामपंचायती वगळता उर्वरित ग्रामपंचायतींना बीडीओ स्तरावर प्रस्ताव सादर करता येतील.

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून अंतिम निवड केली जाईल. जॉब कार्डच्या संख्येनुसार विहिरी मंजूर करण्याची प्रक्रिया असेल. गरजू शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Irrigation Well
Crop Competition : कृषी विभागची बक्षिस योजना जाहीर, पीक स्पर्धेत भाग घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

नियोजनानुसार अकोला तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत क्षेत्रात १४५५ विहिरी, अकोटमध्ये ८५ ग्रामपंचायतीत १२७५, बाळापूर ६६ ठिकाणी ९९०, बार्शीटाकळी ८२ ठिकाणी १२३०, मूर्तिजापूर ८६ ठिकाणी १२९०, पातूर ५७ ठिकाणी ८५५ आणि तेल्हारा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात ८५५ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Irrigation Well
Onion Export : कांद्याचे दर ४०० ते ६०० रुपयांनी गडगडले

शेततळ्यांनाही प्रोत्साहन जिल्ह्यात विहिरी पाठोपाठ शेततळ्यासाठी देखील उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला १० शेततळ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ९७० शेततळे तयार होतील, तर शोषखड्डा (जलतारा) चे देखील प्रत्येक ग्रामपंचायतीला ५० याप्रमाणे टार्गेट देण्यात आले आहे.

अटही शिथिल धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत आधीची दीड एकराची अट शिथिल करून आता एक एकर अट ठेवण्यात आली आहे. दोन विहिरींमधील ५०० मीटरची अट देखील रद्द करण्यात आली आहे. आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, ८-अ उतारा, सातबारा उतारा, जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com