Glory to Entrepreneurs Agrowon
ॲग्रो विशेष

Glory to Entrepreneurs : भारावलेल्या वातावरणात झाला उद्योजकांचा सन्मान

Iconic Brands in Agriculture : जिद्द, चिकाटी आणि प्रयोगशीलतेतून कृषी उद्योगाची उभारणी करीत जगाच्या बाजारपेठेला गवसणी घालणाऱ्या राज्यातील १८ कृषी उद्योजकांचा गौरव बुधवारी (ता. २६) पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ण्यात भारावलेल्या वातावरणात करण्यात आला.

Team Agrowon

Publications of Coffee Table Books : जिद्द, चिकाटी आणि प्रयोगशीलतेतून कृषी उद्योगाची उभारणी करीत जगाच्या बाजारपेठेला गवसणी घालणाऱ्या राज्यातील १८ कृषी उद्योजकांचा गौरव बुधवारी (ता. २६) पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ण्यात भारावलेल्या वातावरणात करण्यात आला. निमित्त होते ते ‘ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या ‘आयकॉनिक ब्रॅण्ड्‍स इन ॲग्रिकल्चर’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याचे.

राज्यातील निवडक नामांकित कंपन्यांचे मालक, संचालक, प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. प्रसन्न वातावरणात, संगीताच्या तालावर कृषी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी करण्यात आला. ‘सन ॲण्ड ओशन’ या कंपनीचे संचालक राजकुमार धुरगुडे पाटील यांचा सर्वप्रथम सन्मान झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सोहळ्याला रंगत चढत गेली, सन्मान स्वीकारताना सन्मानार्थींच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.

ॲग्रोवनचे संपादक- संचालक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्तविका केले. या वेळी राजर्षी शाहू महाराज यांनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना होत असल्याचे फायदे विषद केले. कोल्हापुरात गूळ, कोल्हापुरी चप्पल या उद्योगांना चालना दिल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमधील द्राक्षे, कोकणातील आंबा, खानदेशातील केळी, नागपुरातील संत्रा, मराठवाड्यातील आंबा याद्वारे रोजगार निर्मिती झाल्याचा उल्लेख केला.

‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ॲग्रोवन दैनिकाची गरज व महत्त्व विषद केले. ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी उपस्थित उद्योजकांना प्रेरणा दिली. राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रकाशक विद्याधर अनास्कर यांनी कर्ज घेण्याच्या प्रक्रियेबद्दल उदाहरणांसह मार्गदर्शन केले. आर. के. अक्षय यांनी सूत्रसंचालन केले. उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी आभार मानले.

सन्मानार्थी उद्योजकांची यादी

संजय आहेर, संचालक, देवळा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी, नाशिक

डॉ. स्वप्नील बच्छाव, संतालक, रिचफिल्ड फर्टिलायझर्स, नाशिक

प्रकाश औताडे, संचालक, आयडियल ॲग्रीसर्च, सांगली

डॉ. निखिल चोरगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण, चिपळूण

केतन मेहता, वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) प्रतीक इंडस्ट्रीज, कुपवाड, सांगली

प्रसाद सूर्यवंशी, संचालक, कृषी सम्राट लक्ष्मी ॲग्रो केमिकल्स, जळगाव

प्रसाद सूर्यवंशी, संचालक, कृषिसम्राट लक्ष्मी ॲग्रो केमिकल्स, जळगाव

स्वप्नील मोरे, संचालक, अक्कुदास ट्रेडिंग कंपनी (दूध कांडी)

डॉ.निखिल चोरगे (बँक प्रतिनिधी), रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रत्नागिरी

राजकुमार धुरगुडे -पाटील, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ‘सन अँड ओशन ग्रुप’, पुणे

महेश दामोदरे, संचालक, धनश्री क्रॉप सोल्यूशन्स, पुणे

डॉ. जगदीश जहागीरदार, प्राचार्य, डॉ. गंगाधर पाथरीकर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर

गजानन पाटील, कार्यकारी संचालक, ऊर्जा बायोसिस्टिम, पुणे

हनुमंत मडके -मोहेकर, संस्थापक अध्यक्ष, मोहेकर ग्रुप, धाराशिव

प्रमोद चिकमणी, विपणन अधिकारी, इकोजेन सोल्युशन्स, पुणे

शरद ज्ञानेश्‍वर मोरे, संचालक, प्रतीक हायटेक नर्सरी, पुणे

राकेश काटकर, व्यवस्थापक, मार्केटिंग कम्युनिकेशन, आयसीएल, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT