Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : महाराष्ट्रातील उद्यमशील पशुपालक

Diwali Article 2024 : धनगर हा समाज अनेक वर्षे आपली ‘लक्ष्मी’ घेऊन; म्हणजे मेंढ्या, बकऱ्या, गायी, कुत्रे, घोडे व कोंबड्या यांच्यासह भटक्या अवस्थेत जगताना आजही आढळतो. अशा या जनसमुदायांनी या महाराष्ट्र देशी पाळीव प्राण्यांचे जनुक जपण्याचे महत्कार्य केले आहे.

Team Agrowon

विजय सांबरे

Livestock Farming : आपल्या भारत देशाला पशुपालन व शेतीची प्राचीन परंपरा आहे. आज घडीला आपण भारत हा कृषिप्रधान देश आहे असे म्हणतो; पण खऱ्या अर्थाने भारत हा मूलत: पशुप्रधान देश आहे. याचे अनेक पुरावे पुरातत्व अभ्यासकांपासून ते ग्रामीण इतिहास कथन करणाऱ्या अभ्यासकांनी मांडले आहेत.

त्याचे दस्तऐवज विविध भाषांत उपलब्ध आहेत. मागील दहा हजार वर्षांच्या कालखंडातील कृषी उत्क्रांतीचे विविध टप्पे जाणून घेतले तर, त्यात भटक्या अवस्थेतील मानवी टोळ्या एक जागी स्थिर झाल्या तेव्हा त्यांनी तत्कालीन गरजेतून रानटी प्राण्यांचे पाळीव प्राण्यांमध्ये रुपांतर करण्याचे काम केल्याचे दिसून येईल.

या सर्व प्रक्रियेला शास्रीय भाषेत Domestication असे म्हणतात. संरक्षण व शिकार करण्यासाठी आदिमानवाने कुत्रे पाळायला सुरुवात केली. तदनंतर मांजर असेल, गाई, बैल, घोडे, गाढवे अशी मोठी पाळीव प्राण्यांची शृंखला निर्माण झाली असणार.

दुसऱ्या बाजूला रानटी वनस्पतींपासून विविध पिके व त्यांच्या प्रजाती आद्य शेतकरी समूहाने निर्माण केल्या. या प्रक्रियेला शास्रीय भाषेत Cultivation म्हणतात. एका जागी स्थिर वसाहती निर्माण करून आपली उपजीविका भागवत, अन्नसुरक्षेची निकड पशुपालन व शेती यांतून भागवली. पुढे काही गट फक्त पशुपालक म्हणून जगू लागले. काही समूहांनी शेती व पशुपालन असे दोन्हीही मार्ग स्वीकारले.

काहींनी फक्त स्थानिक स्वरूपाचे पशुपालन सुरू ठेवले व काही गट भटके पशुपालक बनले. जगभर सर्वदूर भटक्या पशुपालकांची एक जीवनशैली तथा संस्कृती पाहायला मिळते. घरदार वा छताशिवाय जगणाऱ्या लोकांचे विश्‍व (A world without roof) अशी या भटक्या पशुपालकांची ओळख आहे.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Interview with Dr. Suhas Diwase: राज्यातील जमीन मोजणी जलद आणि पारदर्शक होणार

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

SCROLL FOR NEXT