Animal Husbandry : शाश्‍वत ग्राम विकासामध्ये पशुपालन आर्थिक कणा ः मेधा कुलकर्णी

Rural Development : दूध उत्पादन वाढीबरोबरीने दुधाची गुणवत्ता हा महत्त्वाचा विषय आहे. पशू उपचारात अति मात्रेत रसायनांचा होणारा वापर पशूंच्या बरोबरीने मानवी आरोग्यावरही परिणाम करत आहे.
Animal Husbandry
Animal Husbandry Agrowon

Pune News : दूध उत्पादन वाढीबरोबरीने दुधाची गुणवत्ता हा महत्त्वाचा विषय आहे. पशू उपचारात अति मात्रेत रसायनांचा होणारा वापर पशूंच्या बरोबरीने मानवी आरोग्यावरही परिणाम करत आहे. त्यादृष्टीने पशुवैद्यक, संशोधकांची जबाबदारी वाढली आहे.

पूरक उद्योगातून गावामध्ये लघू उद्योजक तयार होतील. शाश्‍वत ग्रामविकासाच्या दृष्टीने शेती, पशुपालनाला कृषी पर्यटनाची जोड महत्त्वाची आहे, असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडले.

ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. पशुसंवर्धन आयुक्तालयात उपक्रमशील पशुतज्ज्ञ आणि पशुपालकांचा गौरव करण्यात आला. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृश्‍य प्रणालीद्वारे कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.

Animal Husbandry
Animal Husbandry : देशात पशूपालनाचा वाढता आलेख...

या प्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर, डॉ. रमेश वझरकर, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. व्यंकटराव घोरपडे आदी पशुतज्ज्ञ उपस्थित होते. या वेळी चारा, पशुखाद्य विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Animal Husbandry
Animal Husbandry : म्हशींच्या संगोपनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

या वेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की पशुतज्ज्ञ तसेच प्रयोगशील पशुपालकांचा गौरव हा प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आरे कॉलनी येथे पक्षी संग्रहालयाची सुरुवात करण्याचे नियोजन आहे. याचबरोबरीने देशी गोवंश संशोधन आणि संवर्धनाला देखील चालना देण्याचा प्रयत्न आहे.

कार्यक्रमामध्ये डॉ. अरुण गोडबोले, डॉ. संतोष शिंदे, कुंदन देशमुख, वैभव पवार, डॉ. प्राणेश येवतीकर, डॉ. चैत्राली आव्हाड, शैला नरवडे, सोमनाथ जाधव यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश वझरकर यांनी केले. डॉ. सुनील राऊतमारे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com