Animal Husbandry : प्रतिजैविकांच्या अतिवापराचा जनावरांवर परिणाम

Antibiotics Impact on Animal : प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे जनावरांच्या त्वचेला खाज, सूज येऊ शकते. जनावरांच्या माध्यमातून प्रतिजैविकांचे अवशेष मानवाच्या शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
Antibiotics use of Animal
Antibiotics use of Animal Agrowon
Published on
Updated on

डॉ. एस. एस. सोले, डॉ. सिद्धेश्‍वर वनवे

Uses of Antibiotics : प्रतिजैविक म्हणजे जिवाणूंच्या नाशासाठी किंवा त्यांच्या वाढीला प्रतिकार करण्यासाठी तयार केलेली औषधे. प्रतिजैविकांचा योग्य वापर केल्यास जिवाणूंचा नाश होतो, परंतु अतिवापर केल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.आजच्या काळात जनावरांच्या काळजीसाठी प्रतिजैविकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु प्रतिजैविकांचा अतिवापर केल्यास जिवाणू प्रतिकारक बनतात, ज्यामुळे औषधांचा परिणाम कमी होतो आणि संसर्ग धोका वाढतो.

अतिवापराचे दुष्परिणाम

शरीरातील खाज आणि सूज : त्वचेला खाज येऊ शकते, सूज येऊ शकते, किंवा चेहरा सुजू शकतो.

पचनाच्या समस्या : उलटी, हगवण आणि पचनावर परिणाम होतो.

सांधे आणि चालण्याच्या समस्या : काही वेळा चालताना किंवा सांध्यामध्ये दुखणे सुरू होते.

मूत्रपिंडावर परिणाम : मूत्रपिंडावर वाईट परिणाम होऊन ती कमजोर होऊ शकते.

कानाचे आजार : कानांमध्ये समस्या येऊन ऐकण्यावर परिणाम होऊ शकतो.

पर्यावरणावर परिणाम : प्रतिजैविकांचा अतिवापर केल्यास पर्यावरणावर वाईट परिणाम होऊ शकतो. औषधांचे अवशेष पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते. मानव आणि प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करू शकते.

मानवी आरोग्यावर परिणाम : जनावरांच्या माध्यमातून प्रतिजैविकांचे अवशेष मानवाच्या शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

अन्न साखळीवर परिणाम : प्रतिजैविकांचा अतिवापर केल्यास अन्न साखळीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. जनावरांच्या माध्यमातून प्रतिजैविकांचे अवशेष अन्नात प्रवेश करू शकतात.

आर्थिक नुकसान : प्रतिजैविकांचा अतिवापर केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. जनावरांचे आरोग्य खराब झाल्यामुळे उत्पादन कमी होते.

जनावरांच्या जीवनमानावर परिणाम : प्रतिजैविकांचा अतिवापर केल्यास जनावरांचे जीवनमान कमी होते. त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, ते लवकर आजारी पडतात.

Antibiotics use of Animal
Animal Husbandry : शेतीला मिळाली पशुपालनाची जोड

वापर करताना काळजी

पशुवैद्यकांचा सल्ला घ्या : प्रतिजैविकांचा वापर करण्यापूर्वी नेहमी पशुवैद्यकांचा सल्ला घ्या.

औषधांचा योग्य वापर : औषधांचा वापर फक्त आवश्यकतेनुसार आणि योग्य प्रमाणात करा.

दूध आणि मांसाची चाचणी : औषधांच्या अवशेष मुक्ततेसाठी दूध आणि मांसाची चाचणी करा.

पर्यावरणाचे संरक्षण : औषधांचे अवशेष योग्य प्रकारे नष्ट करा आणि पर्यावरणाचे संरक्षण करा.

योग्य वापर

जनावरांचे दीर्घायुष्य : योग्य वापर केल्यास जनावरांचे दीर्घायुष्य वाढते.

उत्पादन वाढ : जनावरांचे आरोग्य सुधारल्यामुळे उत्पादन वाढते.

शेतकऱ्यांना आर्थिक लाभ : जनावरांचे आरोग्य सुधारल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो.

Antibiotics use of Animal
Animal Husbandry : जातिवंत नर रेडकांची पैदास, संगोपन

अतिवापराचा आरोग्यावर परिणाम

अमोझिसिलीन

त्वचेची समस्या : खाज, सूज, चेहरा सुजणे. पचनाच्या समस्या : उलटी, हगवण, जनावराच्या पोटात (गॅस) वायू धरणे.

गंभीर स्थिती : श्‍वास घेण्यास त्रास, दीर्घकाळ वापरल्यास औषधांचा परिणाम कमी होणे.

एन्रोफ्लोक्सासिन

पचन समस्या : उलटी, हगवण, भूक कमी होणे.

सांधे व चालण्याच्या समस्या : चालताना त्रास, सांध्यांमध्ये दुखणे, या समस्या होऊ शकतात.

मेट्रोनिडाजोल

भुकेची कमतरता : औषधामुळे भूकेवर परिणाम होऊ होऊ शकतो.

पोटाचे विकार : पचन प्रणालीवर परिणाम होऊन जनावरांना हगवण होते.

उलट्या : काही जनावरांना उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

त्वचेची समस्या : त्वचेला खाज सुटणे, सूज येणे.

डॉक्सिसाइक्लिन

दातांचा रंग बदलणे : दात पिवळसर होणे.

पचनाच्या समस्या : उलटी, पोटात दुखणे.

सूर्यप्रकाशाचा त्रास : उन्हात काम केल्यावर त्वचेला त्रास होणे.

जेंटामायसिन

मूत्रपिंडावर परिणाम : दीर्घकाळ वापरल्यास

किंवा उच्च डोस दिल्यास मूत्रपिंड कमजोर होते.

कानाचे विकार : जास्त वापर झाल्यास जनावराचे ऐकणे कमकुवत होऊ शकते.

पाय लटपटणे : जनावर लटपट चालणं किंवा संतुलन बिघडणे होऊ शकते.

प्रतिजैविकांचा वापर करताना...

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापर : प्रतिजैविकांचा वापर फक्त आवश्यकतेनुसार आणि पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार करावा.

औषधांचा पूर्ण वापर : डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधांचा पूर्ण कोर्स करावा.

दूध, मांस चाचणी : औषधांच्या अवशेष मुक्ततेसाठी चाचणी अनिवार्य करावी.

उपचारानंतर काळजी : उपचारानंतर किमान काही काळ पशुजन्य पदार्थांचा वापर टाळावा.

आरोग्य सुधारणा : योग्य वापर केल्यास जनावरांचे आरोग्य सुधारते, उत्पादकता वाढते.

रोगप्रतिबंधक क्षमता वाढते : प्रतिजैविकांचा योग्य वापर केल्यास जनावरांची रोगप्रतिबंधक क्षमता वाढते.

पर्यावरण संरक्षण : योग्य वापर केल्यास पर्यावरणाचे संरक्षण होते, जलप्रदूषण टाळता येते.

- डॉ. एस. एस. सोले, ८३०८३०५३८९

- डॉ. सिद्धेश्‍वर वनवे, ८९९९५९३७९१

(औषधशास्त्र व विषशास्त्र, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com