Beekeeping
Beekeeping Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping : मधमाशांसोबत मैत्रीने घडवला उद्योजक

मुकुंद पिंगळे

नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यातील (Peth Taluka) हनुमंतपाडा हा दुर्गम, आदिवासी भाग (Tribal) आहे. येथील विलास देविदास दरोडे कुटुंबाची तीन एकर जिरायती शेती (Rainfed Agriculture) आहे.

नागली, भात (Rice), उडीद (Urad), वरई आदी पिके ते घेतात. वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने विलास यांनी चिवट संघर्षातून राज्यशास्त्र विषयातील पदवी २०१४ मध्ये घेतली.

सन २०१५ मध्ये वडिलांचे निधन झाली. कुटुंबाची जबाबदारी विलास यांच्यावर आली. अल्प शेती, माफक उत्पन्न व शासकीय नोकरीच्या संधी न मिळाल्याने समोर रोजगाराचा (Employment) शाश्वत पर्याय नव्हता.

त्यामुळे वन विभागात ‘वनमजूर’ म्हणून रोजंदारीवर ते काम करू लागले. उत्पन्न मर्यादित असल्याने पूरक व्यवसायाची संधी ते शोधत होते.

सन २०१८ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या (Khadi Gramodyog Board) वतीने मानव विकास कार्यक्रमांतर्गत मधमाशी पालन (Beekeeping ) व मध संकलन (Honey collection) या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षणाची संधी व नवी दिशा मिळाली.

कौशल्य अंगीकारले

प्रशिक्षणातून मधमाशीपालनाचा शास्त्रीय दृष्टिकोन तयार झाला. खादी व ग्रामोद्योग विभागाकडून पोळे काढणी व मधसंकलन या बाबींसाठी संरक्षक पोशाख व साहित्याचे कीट मिळाले. विलास मग नाशिक जिल्ह्यासह ठाणे, पालघर व जळगाव जिल्ह्यात वन्य भागात मध संकलन करू लागले.

पहिल्याच वर्षी ५०० किलोवर मध संकलन झाला. कौशल्याला अनुभवाची जोड व खादी- ग्रामोद्योग विभागाचे श्री. केंदळे, श्री. गावित, किशोर सुरवाडे, गजानन भालेराव आदींचे मार्गदर्शन लाभले. आदिवासी विकास विभागाच्या तसेच अन्य कृषी प्रदर्शनात, चर्चासत्रे यात सहभाग घेऊन सातत्याने ज्ञानवृध्दी केली.

विलास यांच्या मधमाशीपालनाची वैशिष्ट्ये

आग्या, सातेरी व फुलोरी मधमाशीपालन

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी पट्ट्यात मोठे वनक्षेत्र आहे. पेठ तालुक्यात झाडे-झुडपे, डोंगर कडा- कपाऱ्यांमध्ये आग्या, सातेरी व फुलोरी या जातींच्या मधमाशांच्या वसाहती आढळतात.

हीच बाजू ओळखून विलास तिन्ही जातीपासून मे ते जुलै, सप्टेंबर ते नोव्हेंबर व फेब्रुवारी ते मार्च अशा तीन टप्प्यात मध संकलन करतात.

मधाला मिळवली बाजारपेठ

विलास यांनी मधविक्रीसाठी नाशिक शहरातील निवासी सोसायट्यांना भेटी देऊन ग्राहक साखळी तयार केली. त्यातून मौखिक प्रसिध्दी ( माऊथ पब्लिसिटी) मिळून ग्राहकांची संख्या अजून वाढली.

पेठ तालुक्यात बिलकस येथे धबधबा आहे. येथे पावसाळ्यात अनेक पर्यटक येतात. अशा ठिकाणी मधाचे फायदे सांगून विक्री साधली. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या तीर्थक्षेत्री धार्मिक विधीसाठी पंचामृतासाठी मधाची मागणी असल्याने तेथील बाजारपेठ वाढवली. कोरोनाच्या

पार्श्वभूमीवर आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने मधाला मागणी वाढल्याचा फायदा झाला. अनेक ग्राहक घरी येऊन खरेदी करतात. काही फोनवरून मागणी नोंदवितात. एक किलो, अर्धा किलो व पाव किलो बरणीमध्ये मधाचे पॅकिंग केले जाते.

मेणापासून उत्पन्न

पोळ्यातून मेणही मिळते. आवश्‍यक प्रक्रिया करून २०० ग्रॅम वडी तयार करून प्रति ५० रुपये दराने त्याची विक्री होते.

आदिवासी लोकांच्या पावरी, तारपा आदी वाद्यनिर्मितीसाठी मेणाची आवश्यकता असल्याने त्यास मागणी असते. काही आदिवासी भांड्यांनाही मेण लावतात. शंभर रुपये प्रति किलो दराप्रमाणे वार्षिक २० किलोपर्यंत एकूण विक्री होते.

मध संकलन (प्रातिनिधीक)

वर्ष.. .मध संकलन(किलो).

२०१८...७००

२०१९...८००

२०२०...४००

२०२१...७०

२०२२...१००

(कोरोना काळात मधसंकलन कमी झाले.)

मधाच्या प्रकारानुसार दर रू. (प्रति किलो)

प्रकार...दर

आग्या...५००

सातेरी...८००

फुलोरी...८००

‘मास्टर ट्रेनर’ ची ओळख

क्षमताविकास, ज्ञान, अनुभव, कौशल्य, सातत्य या जोरावर विलास आज खादी- ग्रामोद्योगच्या माध्यमातून ‘मास्टर ट्रेनर’ झाले आहेत.

दीडशेहून अधिक तरुणांना आजपर्यंत प्रशिक्षित केले आहे. त्यातूनही मानधनही मिळते असल्याने उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार झाला आहे.

शेतीत परागीभवन प्रक्रिया महत्त्वाची असते. त्याचे महत्त्व व सातेरी मधमाशीच्या वसाहती शेतात ठेवण्यासाठी विलास मार्गदर्शन करतात.

पेटीत वसाहती भरून शेतकऱ्यांना पुरवठा होतो. प्रति पेटी दोनहजार रुपये दर आकारला जातो. शहरी भागात इमारती, कार्यालये या ठिकाणी आग्या मधमाशांची पोळी दिसून येतात.

मधमाशांना कोणतीही हानी वा इजा न पोचवता शास्त्रीय पद्धतीने अशी पोळी काढून या वसाहतींचे योग्य जागी स्थलांतर करण्यात विलास कुशल आहेत. प्रति कामातून एकहजार ते दोन हजार रुपये व वर्षाला ५० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळते.

कामाने दिली ओळख

१) पिंपळगाव बसवंत (ता.निफाड ) येथील मधुक्रांती प्रदर्शन व परिसंवादात ‘बसवंत मधूक्रांती’ (२०२१) तर आदिवासी दरबार संस्थेकडून आदिवासी कृषी पूरक उद्योजक सन्मान.

२) आई सुमित्राबाई, भाऊ दत्तू व गिरिधर यांची शेतीत समर्थ साथ. पत्नी मंगला किराणा दुकान चालवितात. याठिकाणीही मधाची विक्री.

३) व्यवसायातून आर्थिक प्रगतीसह प्रतिष्ठा मिळाली. कोणत्याही बॅंकेकडून कर्ज, शासकीय अनुदानाची गरज भासली नाही. केवळ कष्टाची तयारी पाहिजे असे विलास सांगतात.

विलास दरोडे- ९२८४९३६८१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT