Beekeeping : कृषिकन्यांकडून मधमाशी पालनाबद्दल जनजागृती

कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी दुगाव येथे मधुमक्षिका पालनाबाबत जनजागृती उपक्रम राबविला.
Beekeeping
BeekeepingAgrowon
Published on
Updated on

नाशिक ः कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी दुगाव येथे मधुमक्षिका पालनाबाबत (Beekeeping) जनजागृती उपक्रम राबविला. या कार्यक्रमात मधुमक्षिका पालनाचे महत्त्व (Importance Of Beekeeping), त्यांचा परागीभवनातील सहभाग व त्यामुळे वाढणारे पिकांचे उत्पादन (Crop Production) याबाबत माहिती देण्यात आली.

Beekeeping
मधमाशी पालन शेतीपूरक व्यवसाय आहे?

यासह कृषिकन्यांकडून माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मातीचा नमुना कसा घ्यावा, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन नियोजन कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माती परीक्षणासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेण्यात आले. जमिनीचा सामू, मातीचा प्रकार, मृदा आरोग्य आदी बाबींविषयी माहिती देण्यात आली.

कृषीकन्या वेदांती काळे, संघर्षा जिवने, वैष्णवी कापसे, दिव्या करपे, प्रांजल केदार व सोनाली खाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकाद्वारे माहिती दिली. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण, श्‍वेता सातपुते, कविता पानसरे, नयन‌ गोसावी, पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com