Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Amit Shah : ‘‘कोकणाचे वैशिष्ट्य असलेल्या आंबा पिकासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ स्थापन केले जाणार आहे,’’ असे केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी येथे केली.
Amit Shah
Amit ShahAgrowon

Ratnagiri News : ‘‘कोकणाचे वैशिष्ट्य असलेल्या आंबा पिकासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ स्थापन केले जाणार आहे,’’ असे केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी येथे केली. तसेच उद्धव ठाकरे यांना आव्हान देत सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करून दाखवा,’’ असे शहा यांनी सांगितले. ‘‘हिंमत नसेल तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात, खरी शिवसेना शिंदेंकडेच आहे,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहा यांची शुक्रवारी (ता. ३) रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभा झाली.

Amit Shah
Mango Crop : वाढत्या उष्णतेमुळे आंबा पीक अडचणीत

या वेळी अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, की रत्नागिरीत १२१ कोटी रुपये खर्च करून मोठे मासेमारी बंदर उभारण्याचे कामही सुरू आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरणही मोदी सरकारने पूर्ण केले आहे. म्हणूनच विकासाकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गवासीयांनी नारायण राणे यांना निवडून द्यावे, असे ते म्हणाले.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘‘राम मंदिर झाले ते चांगले झाले, असे उद्धव ठाकरे मुंबईत सभा घेऊन विचारू शकतात का, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव सभेत घ्यायला उद्धव ठाकरे धजावतील का, उद्धव यांनी बाळासाहेब यांच्या घरात जन्म घेतला असला, तरी त्यांचा खरा वारसा नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्याकडे आला आहे. गादी मिळविण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधींकडे जाणारे महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

सांगलीतील सभेत शरद पवारांवर टीका

‘‘सांगलीतला आशिया खंडातील सर्वांत मोठ्या साखर कारखान्यासह राज्यातील २०१ साखर कारखान्यांपैकी १०१ कारखाने बंद पडले. राज्यातील ३४ जिल्हा बॅंकांपैकी ३२ बॅंकांवर प्रशासक का आणले, याचे उत्तर माजी केंद्रीय मंत्री म्हणून शरद पवार यांनी द्यावे,’’ असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

Amit Shah
Mango Crop Damage : आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत

भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार (ता. ३) विटा येथे आयोजित सभेत बोलत होते. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, सुहास बाबर, यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.

शहा म्हणाले, की सांगली जिल्ह्यातील टेंभू सिंचन योजना १९९८ पासून २०१४ पर्यंत याचे काम अपूर्ण होते. त्या अपू्र्ण योजनांचे काम पूर्ण करण्याची त्यांची मानसिकता नव्हती. सन २०१४ ला भाजपची सत्ता आली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१४ ते २०२४ टेंभूसाठी २१०९ कोटीं खर्च झाला. मोदी सरकारने त्यासाठी ११२८ कोटी निधी उपलब्ध करून दिला. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात २ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com