Krushik 2025  Agrowon
ॲग्रो विशेष

Krushik 2025 : शेतीमालाला हमीभाव, मजूर टंचाई प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे

Baramati KVK Exhibition : बारामतीच्या कृषिकमध्ये नेदरलॅंड, ब्राझील, इस्त्राइल, अमेरिका, अफ्रिका, स्पेनसारख्या अनेक देशांतील शेतीमधील अधुनिक तंत्रज्ञान पहावयास मिळाले याचे एकाबाजूला समाधान आहे.

Team Agrowon

Baramati News : बारामतीच्या कृषिकमध्ये नेदरलॅंड, ब्राझील, इस्त्राइल, अमेरिका, अफ्रिका, स्पेनसारख्या अनेक देशांतील शेतीमधील अधुनिक तंत्रज्ञान पहावयास मिळाले याचे एकाबाजूला समाधान आहे. परंतु दुसऱ्या बाजूला भारतात शेतीमालाला हमीभाव, मजूर समस्या आणि वीज पुरवठ्याचे प्रश्न शासनस्तरावर सुटणे तितकेच महत्त्वाचे आहे.

तसे झाल्यास आमच्या शिवारात कृषिकमधील तंत्रज्ञान राबविणे आणखी सोपे होईल. त्यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहेत, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. त्यामध्ये विदर्भ व मराठवाडासह राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांचा समावेश होता.

‘बारामती कृषिक’ हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे त्यांच्या उपस्थितिवरून स्पष्ट होते. या प्रदर्शनाच्या रविवारी (ता. १९) चौथ्या दिवस असतानाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहवयास मिळाला.

ऊस पिकातील एआय तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, ड्रोनद्वारे शेतात पाणी व्यवस्थापन, अॅग्रिकल्चरल रोबोट्स, मातीतील कणांचे रचना शोधणारे यंत्र, माती परीक्षण किट, पोर्टेबल एक्स-रे फ्लोरेस्सन्स, फर्टिगेशन आणि सिंचन प्रणालीत आयओटी सेन्सर्स आणि ऑटोमेशनचा वापर केल्याचे शेतकऱ्यांना प्रदर्शनात पहावयास मिळाले.

अर्थात हे तंत्रज्ञान नेदरलॅंड, ब्राझील, इस्त्राइल, अमेरिका, अफ्रिका, स्पेन सारख्या प्रगत शेतात वापरले जाते. विशेषतः महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक शेतकरी हे तंत्रज्ञान आपल्या शिवारात राबवण्याची इच्छा व्यक्त करीत होते, तर विदर्भ व मराठवाडासह राज्याच्या विविध भाातील बहुतांश शेतकरी शेतीमालाला हमीभाव, मजूर समस्या आणि वीज पुरवठ्याचे प्रश्न सुटेपर्यंत आमच्या शिवारात हे तंत्रज्ञान राबवण्याचे धाडस होत नसल्याचे सांगत होते.

हमी भावासाठी ठोस निर्णय व्हावा

शेती उत्पादन खर्च अधिक होत असल्याने दराअभावी फारसेकाही शिल्लक राहत नाही. शेतीमालाच्या हमीभावाबाबत ठोस निर्णय शासनस्तरावर व्हायला हवा. कृषिक प्रदर्शनातून शेतकऱ्यांना शेतातील अधुनिक टेक्नॉलॉजीच्या आधारे लक्षवेधी उत्पन्न काढण्याचे कौशल्य मिळत आहे. परंतु हमीभाव, मजूर समस्या आणि वीड पुरवठ्याचे प्रश्न भेडसावत आहेत. परिणामी आमच्या शिवारात ही टेक्नॉलॉजी राबवविणे भीतीदायक वाटते, असे मत संतोष भिलारे (रा. माजलगाव, जि. बीड), बालाजी जेधे (जि. हिंगोली) यांनी बोलून दाखविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT