
Baramati News : ‘कृषिक’मध्ये पीक प्रात्यक्षिकांचे आगार आहे, असे सांगत राज्यभरातील हजारो शेतकरी आपल्या कुटुंबासमवेत विविध पिकांची माहिती घेत होते. रोजचे कष्टाचे शेतीकाम बंद ठेवून उत्सुकतेने अनेक शेतकरी महिला, कृषी तंत्रज्ञानाच्या शोधासाठी गावागावातून, मित्रमंडळींसह येणारे युवा शेतकरी यामुळे ‘कृषिक २०२५’ मध्ये दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले.
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्रावर भरलेले कृषिक प्रदर्शन शेतकऱ्यांनी गजबजले आहे. कृषी निविष्ठा, बी-बियाणे, सिंचन सुविधेसह सेंद्रीय शेती व हायटेक शेती संबंधीची माहिती फायदेशीर ठरल्याचे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.
पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी शिवारात उतरलेला शेतकऱ्यांचा लोंढा पाहूनच कृषिक प्रदर्शन दुसऱ्या दिवशी यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती हे आमच्या दृष्टीने आश्चर्याचे आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. शिंदे यांनी व्यक्त केले.
सेन्सर तंत्रज्ञानाची भुरळ...
शेतकऱ्यांनी आयओटी सेन्सर तंत्रज्ञान पाहिले. जमिनीतील आर्द्रता, तापमान, पोषणमूल्ये आणि पाण्याची पातळी मोजण्यासाठी हे सेन्सर उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
सेन्सरद्वारे गोळा केलेला डेटा मोबाइल अॅप्सवर पाहता येतो ज्याने शेतकऱ्यांना वेळेवर निर्णय घेता येईल, ही माहिती देताच कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनी आनंद तर व्यक्त केलाच, शिवाय त्यांनी आमच्या शेतात हे तंत्रज्ञान घेणार असल्याचे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.