
Baramati News : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने गुरुवारपासून (ता. १६) आयोजित ‘कृषिक २०२५’ या कृषिविषयक प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन करणारी शेती कशी शक्य आहे हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट देण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी केले आहे.
आधुनिक शेती तंत्रज्ञान, स्मार्ट उपकरणे आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेवर आधारित प्रयोग येथे पाहता येणार असून ज्यामुळे शेती अधिक उत्पादन देणारी, शाश्वत आणि फायदेशीर होईल.
प्रदर्शनात हे पाहता येईल...
- आयओटी सेन्सर तंत्रज्ञान : जमिनीतील आर्द्रता, तापमान, पोषणमूल्ये आणि पाण्याची पातळी मोजण्यासाठी उपयुक्त. सेन्सरद्वारे गोळा केलेला डेटा मोबाइल अॅप्सवर पाहता येतो ज्याने शेतकऱ्यांना वेळेवर निर्णय घेता येतील.
- ड्रोन तंत्रज्ञान : या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना पिकांचे निरीक्षण, कीटकनाशक व खते फवारणी, तसेच नकाशे तयार करण्यासाठी करता येतो. ड्रोनद्वारे अचूक आणि जलद फवारणी केली जाते, ज्यामुळे वेळ, श्रम आणि रसायनांचा अपव्यय टाळता येतो.
- ड्रोनद्वारे शेतात पाणी व्यवस्थापन, थ्रीडी नकाशे तयार करणे, जमिनीची स्थिती तपासणे शक्य होते, ज्याची शेतकऱ्यांना योग्य सिंचन आणि लागवडीसाठी मदत मिळते.
- अॅग्रिकल्चरल रोबोट्स...
स्मार्ट वीडर आणि स्प्रेअर रोबोट : स्मार्ट वीडर आणि स्प्रेयर रोबोट अचूक तण नियंत्रणासाठी विकसित केला आहे.
• मातीतील कणांचे रचना शोधणारे यंत्र ः विविध माती प्रकारानुसार जमिनीची योग्य मशागत एका विशिष्ट खोलीवर करण्यासाठी हे तंत्रज्ञान मदत करणार आहे.
• माती परीक्षण किट : स्मार्टफोन-सहाय्यित इमेजिंग उपकरण शेतजमिनीसाठी कृषी निविष्ठा आणि पर्यावरणीय प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी आहे.
• स्मार्टफोनच्या साह्याने या उपकरणामध्ये
संकलित केलेला डेटा एका अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होतो, ज्यामुळे ते त्यांच्या शेताची स्थिती तपासू शकतात आणि योग्य प्रमाणात खते वापरून पिकांचे उत्पादन सुधारू शकतात.
• पोर्टेबल एक्स-रे फ्लोरेस्सन्स : कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पोर्टेबल एक्स-रे फ्लोरेस्सन्स (PXRF) स्कॅनर वापरून माती परीक्षण जलद आणि कमी खर्चीक करू शकतो.
• फर्टिगेशन आणि सिंचन प्रणालीत आयओटी सेन्सर्स आणि ऑटोमेशनचा वापर करून मातीतील आर्द्रता, पोषणमुल्ये, आणि हवामानाचा अभ्यास केला जातो.
• शेतकऱ्यांना प्रदर्शनात स्मार्ट आयओटी हवामान केंद्र आणि उपग्रह प्रतिमा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
• उपग्रह प्रतिमांसाठी, शेतकऱ्यांना पिकांचे आरोग्य, जमिनीची स्थिती, आणि पिकांच्या वाढीचे मॉनिटरिंग करण्यासाठी उपग्रहांच्या माध्यमातून अचूक आणि विस्तृत चित्र मिळेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.