Revenue Department Agrowon
ॲग्रो विशेष

Revenue Week : जलद सेवेची कार्यपद्धती कायमस्वरूपी अंगीकारा

Revenue Department : महसूल सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी गतवर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला.

Team Agrowon

Akola News : जलद, पारदर्शक व कार्यक्षम सेवाभिमुख कार्यपद्धती ही केवळ आठवडाभरापुरती मर्यादित न ठेवता ती प्रशासनाच्या व्यवहारात कायमस्वरूपी अंगीकारली जावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने नियोजन भवनात महसूल दिन साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अजित कुंभार होते. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, जोगेंद्र कट्यारे, निखिल खेमनार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे व संदीपकुमार अपार, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी भारती खंडेलवाल, जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तहसीलदार गौरी धायगुडे, अधीक्षक श्याम धनमने, जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले, की महसूल विभागाने प्रशासनातील काळानुरूप बदल आत्मसात करीत जलद व उत्तरदायित्व पूर्ण सेवा प्रदान करण्याची परंपरा जपली आहे.

सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण, ई-चावडी, ॲग्रीस्टॅकसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महसूल सेवा अधिक पारदर्शक आणि परिणामकारक झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन किंवा तातडीच्या प्रसंगी महसूल विभागाने प्रत्येकवेळी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

महसूल सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी गतवर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला. मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, अकोल्याचे तहसीलदार सुरेश कव्हळे, नायब तहसीलदार डॉ. सागर भागवत, नितीन लोणकर, नीलेश सांगळे, मंडळ अधिकारी देवेंद्र खडके, ग्राम महसूल अधिकारी संगीता दराडे, महसूल सहायक अरुणा जोशी, वाहनचालक अमोल पवार, गजानन खोले, प्रतिज्ञा कावरे, पोलिस पाटील संजय गोमासे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, दत्तू जुमडे, नीलेश शेंडे, उज्ज्वला कातखेडे, प्रमोद रंगारी, अनिल घ्यारे, स्वप्नील पागृत, संजय भालेराव, सुनीता शिंदे यांचा गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती

Ranmewa Income: रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी

Sugarcane Production: आडसाली, सुरू, खोडवा उसात सातत्यपूर्ण उल्लेखनीय उत्पादन

Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT