Soil Fertility Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Fertility : जमिनीच्या सुपीकतेचे संवर्धन

Soil Conservation : माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार खतांचा वापर करावा. मृद्‌ व जलसंधारण करुन जमिनीची धूप टाळावी. आंतरपीक तसेच इतर पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.

Team Agrowon

वैभव बोडके

Soil Health : पिकांसाठी अनियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर, माती परीक्षण न करता  रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खतांचा वापर महत्त्वाचा आहे. जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक असे विविध गुणधर्म असतात.

मूलभूत व विविध अत्यावश्यक अन्नद्रव्यांचा पिकांना पुरवठा करण्याच्या जमीन सुपीक असणे महत्त्वाचे आहे. जमीन जितकी सुपीक त्याप्रमाणात पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो, उत्पादन चांगले मिळते. महाराष्ट्रातील जमिनीतील घटकांचे प्रमाण पाहता असे लक्षात येते की नत्र, स्फुरद जास्त प्रमाणात आहे. त्यामानाने इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे.

जमीन सुपीकता कमी होण्याची कारणे

  • एकाच पिकाची दरवर्षी लागवड उदा. कापूस, ऊस

  • लागोपाठ पिके घेणे, बहुपीक पद्धती

  • एकच अन्न घटक असलेल्या खतांचा दीर्घकालीन वापर.

  • वर्षानुवर्ष एकाच जमिनीत संतुलित खते न देता पिके घेणे.

  • पाण्याचा अतिवापर केल्यामुळे जमिनी क्षारयुक्त, चोपण होतात. त्यांची सुपीकता खालावत आहे.

  • जमिनीची धूप, अयोग्य मशागत आणि लागवड पद्धती.

  • सेंद्रिय खते, भूसुधारकांचा कमी वापर.

मृद्‌ आरोग्य पत्रिका :

खतांच्या समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना मिळावी यासाठी कृषी विभागाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद्‌ आरोग्य पत्रिका योजना राज्यभर राबविण्यास सुरुवात केली आहे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीचे रासायनिक गुणधर्म, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची माहिती देण्यात येते.

विविध खतांच्या कार्यक्षमता :

  • नत्र ३० ते ५० टक्के

  • स्फुरद १५ ते २० टक्के

  • पालाश ५० ते ६० टक्के

  • जस्त २ ते ५ टक्के

  • लोह १ ते २ टक्के

खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय ः

  • खते जमिनीवर फेकून देऊ नयेत. जमिनीत योग्य ओलावा असताना खते द्यावीत.

  • पेरणी करताना खते बियाण्याखाली पेरून द्यावीत.

  • मुळाच्या सान्निध्यात खतांच्या मात्रा द्याव्यात.

  • आवरणयुक्त खते, ब्रिकेट्स, सुपर ग्रॅन्युलस खताचा वापर करावा.

  • युरिया निंबोळी पेंड सोबत ५:१ प्रमाणात वापर करावा.

  • पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत खते विभागून द्यावीत.

  • सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा.

  • पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा.

  • तृणधान्य पिकांसाठी ४:२:२:१ (नत्रःस्फुरदःपालाश: गंधक) या प्रमाणात तर कडधान्यासाठी १:२:१:१ प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर करावा.

  • माती परीक्षणावर आधारीत शिफारशीनुसार खतांचा वापर करावा.

  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फवारणीव्दारे करावा.

  • पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

  • रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय खतांसोबत (कंपोस्ट, गांडूळ खत, शेणखत) करावा.

  • सेंद्रिय खतांचा नियमित वापर करुन जमिनीचा सामू ६.५-७.५ दरम्यान आणावा.

  • विविध जिवाणू खतांचा (रायझोबियम, पीएसबी, अॅझोटोबॅक्टर) बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.

  • समस्यायुक्त क्षारयुक्त व चोपण जमिनीत भुसुधारकांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीचे खत, प्रेसमड, ऊस मळी) शिफारशीनुसार वापर करावा.

  • मृद्‌ व जलसंधारण पध्दतीचा अवलंब करावा.

सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपाय ः

कमी मशागत करावी.

मृद व जलसंधारण करुन जमिनीची धूप टाळावी.

आंतरपीक तसेच इतर पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.

जमिनीवर आच्छादनाचा (उसाचे पाचट, गव्हाचा भुसा) वापर करावा.

पिकांचे अवशेष (पिकांचा १/३ भाग) न जाळता जमिनीत गाडावेत.

जमिनीत पिकांचे अवशेष कुजवावेत.

भर खतांचा (शेणखत / कंपोस्ट / गांडूळ खत) आणि हिरवळीच्या पिकांचा

(धैंचा, गिरीपुष्प) नियमित वापर करावा.

शेताच्या बांधावर वारा गतिरोधक तसेच गिरीपुष्प, हिरवळीचे पिके लावावीत.

शेतीची पशुधन संगोपनाशी सांगड घालावी.

वैभव बोडके, ७७६८०८२३१९

(डॉ. वि. वि. पाटील सहकारी प्रबंध संस्था, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baramati Agriculture Development : दुबईतील परिषदेत बारामतीतील उपक्रमाची दखल

Ind-US Trade War : डोनाल्ड ट्रम्प यांचे करयुद्ध आणि भारत

Heavy Rainfall: राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा; नांदेडमध्ये पूरस्थिती, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत संततधार

Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास

Healthy Tiffin: व्यस्त दिनचर्येतही आरोग्यदायी टिफिनचा सोपा पर्याय

SCROLL FOR NEXT