Soil Health Quality : पीक फेरपालट केल्यास जमिनीची प्रत सुधारते

Dr. P.G.Patil : चांगल्या पद्धतीची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी तसेच अनुकूल पर्यावरण तयार होण्यासाठी पिकांचे विविधीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
Mahatma Phule Krishi Vidyapeeth
Mahatma Phule Krishi VidyapeethAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांमुळे पिकांची फेरपालट होऊन जमिनीची प्रत सुधारते. त्यामुळे त्यापुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या उत्पादनात भर पडते. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी तसेच अनुकूल पर्यावरण तयार होण्यासाठी पिकांचे विविधीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची रब्बी व उन्हाळी पीक संदर्भात आयोजन बैठक झाली. कुलगुरू डॉ. पाटील अध्यक्षस्थानी होते. संशोधन संचालक विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषी संचालक रफिक नाईकवडी, कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, पुणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खडबडे व सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार उपस्थित होते.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth
Crop Rotation : धानपट्ट्यात पीक फेरपालटावर भर द्या

डॉ. पी. जी. पाटील म्हणाले, की विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये या वर्षी ६ वाण, ५ अवजारे व ९२ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी दिल्या आहेत. तसेच विविध पिकांचे ११ वाण देशपातळीवर प्रसारित झालेले आहेत. ड्रोन प्रशिक्षण देणारे देशातील हे एकमेव विद्यापीठ आहे. पुणे येथे देशी गाईबाबत तीन महिन्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठ जैविक खते, जैविक औषधे व जैविक कीटकनाशकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत असते.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth
Soil Erosion : जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्‍वत उत्पादन

या उत्पादनांना कृषी विभागाकडून अधिक मागणी नोंदवली तर महसुलात वाढ होईल. या वेळी डॉ. साताप्पा खरबडे यांनी हुमणीच्या नियंत्रणाबाबत, डॉ. सचिन नलावडे यांनी ड्रोनद्वारे करावयाच्या फवारणीसाठी कीटकनाशकांच्या प्रमाणाबाबत, डॉ. विजू अमोलिक यांनी ज्वारी, ऊस व मका पिकांविषयीचे प्रश्‍न, डॉ. बी. टी. पाटील यांनी कांदा, आंबा, द्राक्ष व केळी याविषयी, डॉ. अण्णासाहेब नवले यांनी द्राक्ष, हळद, आले व केळी या पिकांविषयी, डॉ. नितीन दानवले यांनी करडई पिकाच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले.

तंत्रज्ञान पोहोचविण्याचे प्रयत्न : रफीक नाईकवाडी

कृषी संचालक रफिक नाईकवडी म्हणाले, की यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. कृषी विभागाकडे खते तसेच बियाणे उपलब्धता चांगली आहे. भरपूर पाणी आहे, बियाणे उपलब्ध आहे तरी या गोष्टीचा फायदा उठवूया. विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com