Sugar Quota Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Sales Quota : वर्षातील शेवटचा साखरेचा विक्री कोटा फायद्याचा की तोट्याचा, प्रतिक्विंटल साखरेच्या दरात वाढ

Sugar Quota : २ ऑक्टोबरपासून पश्‍चिम बंगालमध्ये दसरा सण सुरू होतो. त्याच्या पूर्वतयारीसाठी दहा-पंधरा दिवस अगोदरच साखरेची मागणी असते.

sandeep Shirguppe

Sugar Sales Quota Profit : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबरचा साखर विक्रीचा घटवलेला कोटा, रेल्वेने दरात दिलेली सूट आणि सणांमुळे साखरेची मागणी व दरातही वाढ झाली आहे. यामुळे साखरेच्या दरात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांसह कारखानदारांच्या पत्त्यावर पडणार आहे. मागच्या ४ दिवसांपूर्वी सप्टेंबरचा विक्री कोटा २३ लाख ५० केला. गेल्यावर्षी तो २५ लाख टन होता. यावेळी तो दिड लाख टनांनी घटवला आहे.

साखरेचा कोटा घटवल्यानंतर २४ तासांतच साखरेच्या दरात प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, यावर्षीचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या सप्टेंबरचा जाहीर झालेला कोटा हा हंगामातील शेवटचा कोटा असले. १ ऑक्टोबरपासून नवा कोटा केंद्र सरकारकडून जाहीर होणार आहे.

साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपये आहे. पण, गेल्या महिन्यापासून देशभरात प्रतिक्विंटल ३५०० ते ३५५० रुपये दराने साखर विक्री होत आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर हे तीन महिने देशभरात सणासुदीचे असतात. या काळात साखरेची मागणी मोठी असते.

पण, त्याचवेळी केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यांप्रमाणेच सप्टेंबरमध्येही साखर विक्रीचा कोटा घटविल्याचा परिणाम दरावर झाला आहे. परिणामी, दर ३६०० ते ३६५० पर्यंत वाढले आहेत. अजून दहा-पंधरा दिवसांनी हाच दर प्रतिक्विंटल ३७०० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाच आहे. त्यामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यांतील सर्व साखर विक्री झाल्याने शिल्लक विक्री साठा नाही. त्यात सप्टेंबरचा कोटा दीड लाख टनांने घटविला आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून रेल्वेने साखर वाहतुकीसाठी प्रतिपोते ४० ते ५० रुपयांची सूट दिली आहे.त्यामुळे आसाम,पश्‍चिम बंगालमधून साखरेची मागणी वाढली आहे.

२ ऑक्टोबरपासून पश्‍चिम बंगालमध्ये दसरा सण सुरू होतो. त्याच्या पूर्वतयारीसाठी दहा-पंधरा दिवस अगोदरच साखरेची मागणी असते. रेल्वेची सवलत ३० सप्टेंबरपर्यंतच असल्याने त्याचा फायदा उठविण्यासाठी अन्य राज्यांतून साखरेची मोठी मागणी अपेक्षित आहे. ऑगस्टच्या शिल्लक कोट्यास मुदतवाढ नाही. या सर्व कारणांमुळे साखरेची मागणी आणि दरही वाढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT