Land Encroachment  Agrowon
ॲग्रो विशेष

Grazing Land Encroachment : गायरान जमिनीवरील अतिक्रमण ‘जैसे थे’

Government Land Issue : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे स्वतःहून हटवण्याचे आदेश तीन वर्षांपूर्वी न्यायालयाने दिले होते.

Team Agrowon

Raigad News : रायगड जिल्ह्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले असून गावठाणाला लागून असलेल्या गायरान जमिनीवर अतिक्रमण वाढत आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे स्वतःहून हटवण्याचे आदेश तीन वर्षांपूर्वी न्यायालयाने दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तीन हजार ९३५ ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या; परंतु तीन वर्षांत जिल्हा प्रशासनाला एकही अतिक्रमण हटवता आलेले नाही.

गाव पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाने गावाजवळ कोट्यवधी रुपयांच्या गायरान जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी जेव्हा गायरान जमिनी मोकळ्या करण्याचे आदेश देण्यात आले, त्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. त्यामुळे मतदार नाराज होतील, याचे कारण सांगत गावपुढाऱ्यांनी राजकीय लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला, त्यामुळे कारवाई रेंगाळली.

जिल्ह्यात ९९.८० हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. यापैकी साधारण २० हेक्टर सरकारी जमिनीवर अतिक्रमण अलीकडच्या काळात करण्यात आल्‍याचे महसूलच्या अहवालावरून दिसून येत आहे.

पनवेल, खालापूर, कर्जत, अलिबाग येथे राहण्यासाठी येणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना ग्रामस्थांनी जमिनी विकल्याने गावठाण विस्तारीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शंभरहून अधिक गावठाण विस्तारीकरणाची प्रकरणे प्रलंबित आहेत. या परिस्थितीत गावातील मूळ निवासी नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळत नसल्याचे अतिक्रमण झाल्याचे समोर येत आहे.

चार तालुक्यांमध्ये शून्य अतिक्रमण

काही तालुक्यांमध्ये अतिक्रमणाचे प्रकार वाढत असताना जिल्ह्यात असेही काही तालुके आहेत, ज्‍या ठिकाणी एकही अतिक्रमित बांधकाम नाही. अशा तालुक्यांमध्ये उरण, तळा, पोलादपूर आणि म्हसळा या तालुक्यांचा समावेश आहे.

श्रीवर्धन तालुक्यामध्ये फक्त नऊ अतिक्रमणे आहेत, तर सर्वाधिक ७९४ खालापूर, ७९३ कर्जत तालुक्यात आहेत. तर सर्वात जास्त अतिक्रमणाखालील क्षेत्र पनवेल तालुक्यात ३४ हेक्टर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Monsoon: मॉन्सूनची आगेकूच!

APMC Facilities Issue: हळदीच्या आवकेत वाढ, मोजमापासाठी जागा अपुरी

Onion Storage Policy Issue: कांदा साठवणुकीच्या धोरणावर संशयाचे सावट

Paraquat Dichloride Ban: पॅराक्वॉट डाय-क्लोराइडवर देशव्यापी बंदीची तयारी

Maharashtra Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT