Horticulture Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Horticulture Scheme : फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा

Fruit Crop Cultivation : फळे, भाजीपाला व फुले क्लस्टर तयार केल्यास यातून स्थानिक उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. काढणीयोत्तर व्यवस्थापन घटकातून रोजगारनिर्मिती होईल.

Team Agrowon

Nanded News : सामूहिक शेततळे, हरितगृह, शेडनेटगृह, पॅकहाऊस, कांदाचाळ, प्लॅस्टिक मल्चिंग या बाबींची शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांना कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बैठकीत महिंद्रकर बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, देगलूर उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल गीते, किनवट उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, शेतकरी प्रतिनिधी प्रसाद देव, सर्व तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महिंद्रकर म्हणाले, की फळे, भाजीपाला व फुले क्लस्टर तयार केल्यास यातून स्थानिक उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. काढणीयोत्तर व्यवस्थापन घटकातून रोजगारनिर्मिती होईल. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनेच्या खर्चाचा व नवीन कृती आराखड्याचाही आढावा त्यांनी घेतला.

त्यानंतर श्री. महिंद्रकर यांनी नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथील शेतकरी बापूराव पुयड यांच्या शेतातील हरितगृहाची व त्यातील जर्बेरा लागवडीची पाहणी केली. त्यानंतर मुदखेड तालुक्यातील बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांच्या शेतातील शेडनेट हाऊस, शेडनेट हाऊसमधील रोपे उत्पादन व स्ट्रॉबेरीची त्यांनी पहाणी केली.

त्यानंतर अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील गंगाबाई कदम यांच्या शेतातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटिका व त्यातील भाजीपाला रोपे उत्पादन याची पहाणी केली. या दौऱ्यात नांदेडचे तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, अर्धापूरचे तालुका कृषी अधिकारी विशाल बिऱ्हाडे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT