Women Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : नाबार्ड सहलीतून महिलांच्या शेतीविषयक ज्ञानात भर

NABARD : या उपक्रमाची अंमलबजावणी संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी व जय शिवराय पाणलोट विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

Team Agrowon

Nanded News : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) अर्थसहाय्यित एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल कार्यक्रम अंतर्गत, काटकळंबा (ता. कंधार) येथील महिला बचत गटांच्या ४८ महिलांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गुरुवारी (ता. १९) एक दिवसीय अभ्यास सहल आयोजित करण्यात आली.

या उपक्रमाची अंमलबजावणी संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी व जय शिवराय पाणलोट विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. सहलीसाठी नाबार्डचे नांदेड जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालय, कृषी यांत्रिकीकरण विभाग, अन्नप्रक्रिया प्रयोगशाळा आदी विभागांमध्ये महिला सदस्यांना महिला सक्षमीकरण, पोषण आहार, आरोग्य, शेती यांत्रिकीकरण, अन्न प्रक्रिया व लघुउद्योग संधी यावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन मिळाले.

प्रमुख सत्रांमध्ये डॉ. जया बंगाळे, डॉ. अश्विनी भिडवे, डॉ. नीता गायकवाड, डॉ. जायभाये, डॉ. प्रमोदिनी मोरे आदींनी विचार मांडले. सहलीचे नियोजन गंगामणी अंबे व लक्ष्मण चव्हाण, रामदास बस्वदे यांनी केले. सगरोळी कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. माधुरी रेवणवार यांचे मार्गदर्शन तर जय शिवराय पाणलोट समिती व ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. हा उपक्रम महिलांच्या शेतीविषयक ज्ञानात भर घालणारा, व्यवसायासाठी प्रेरणादायी आणि सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

ही सहल आमच्यासाठी खूपच फलदायी आणि प्रेरणादायी ठरली. विद्यापीठातील तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आणि व्यवसायाच्या नव्या संधी उघडल्या. नाबार्ड आणि संस्था यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली.
- अनुसया घंटेवाड, अध्यक्ष, रेणुकाई संयुक्त महिला संघ, काटकळंबा (ता. कंधार)
अभ्यास सहलीच्या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि बौद्धिक सक्षमीकरण होऊन, शेती ते स्वयंरोजगार असा विकासाचा मार्ग उलगडला जात आहे. नाबार्ड व सहभागी संस्थांचे हे स्तुत्य कार्य इतर भागांनाही प्रेरणा देणारे ठरत आहे.
- दिलीप दमय्यावार, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT