Employment Guarantee Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Employment Guarantee Scheme : ‘रोहयो’च्या मजुरीत २४ रुपयांची वाढ

MGNREGA Wages : केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात दिवसाला २९७ रुपये मजुरी देण्यास मान्यता दिली आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात दिवसाला २९७ रुपये मजुरी देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत ‘रोहयो’वरील कामासाठी मजुरांना प्रतिदिन २४ रुपये अधिक मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो कक्षातून मिळाली.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरी दराबाबत २७ मार्च रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली. यात देशातील नवे वेतन दर जाहीर केले आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव अमित कटारिया यांनी नवे हे दर १ एप्रिल २०२४ पासून दिले जातील.

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांना लक्षात घेऊन ‘रोहयो’ची नवीन मजुरी लागू केली आहे. ही मजुरी गुजरातसाठी २८० रुपये, कर्नाटकसाठी ३४९ रुपये, मध्य प्रदेशसाठी २४३ रुपये, तेलंगणासाठी ३०० रुपये आणि गोव्यासाठी ३५६ रुपये प्रतिदिन असणार आहे.

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामांना प्रोत्साहन मिळेल. १ एप्रिलपासून सर्व अकुशल कामांच्या मजुरीमध्ये प्रतिदिन २४ रुपयांनी वाढ होणार आहे. मागीलवर्षी २७३ रुपये प्रतिदिन मजुरी होती. यात आता वाढ केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना विविध फळबाग लागवड, तुती लागवड, सिंचन विहिरींच्या कामासाठी होणार आहे.

‘रोहयो’त एका व्यक्तीला १०० दिवस रोजगार

ऑगस्ट २००५ मध्ये मनरेगा हा कायदा पास करण्यात आला. या कायद्यानुसार कामाचा अधिकार मिळतो. एप्रिल २००८ पासून ही योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला १०० दिवस रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मनरेगा योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असते. या योजनेच्या माध्यमातून रोजगार शोधणाऱ्यांना पाच किलोमीटरच्या परिघात काम दिले जाते आणि त्यासाठी किमान वेतनही दिले जाते. अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत काम न मिळाल्यास त्याला बेरोजगारी भत्ता देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Rajan Patil: सहकार परिषद कृतिशील होईल

Indigenous Cattle: ही ‘लक्ष्मी’ जपणार कोण?

Agriculture Pest Infestation: मूग, उडीद पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

SCROLL FOR NEXT