MGNREGA Worker : ‘मनरेगा’च्या कामांवर ४८ हजारांवर मजूर

Worker Update : परभणी जिल्ह्यातील ४७७ ग्रामपंचायती अंतर्गत ३ हजार ९११ कामे सुरू आहेत. या कामांवर ४८ हजार १२८ मजूर काम करत आहेत.
MGNREGA Worker
MGNREGA Worker Agrowon

Parbhani News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सोमवार (ता. २६) अखेर परभणी जिल्ह्यातील ४७७ ग्रामपंचायती अंतर्गत ३ हजार ९११ कामे सुरू आहेत. या कामांवर ४८ हजार १२८ मजूर काम करत आहेत.

जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी स्थितीत गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणखी कामे सुरू केली जातील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण यांनी दिली.मागील (२०२३) वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

MGNREGA Worker
MGNREGA : नांदेडला मजुरांना आधार प्रणालीनुसार मंजुरी

जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडलात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करुन सवलती व उपयोजना लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढला आहे.

त्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्याचा समावेश आहे. ग्रामीण भागातून शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे यासाठी गावातच रोजगार उपलब्ध करून देणे हा या उद्देश आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील ७०४ पैकी केवळ ४७७ ग्रामपंचायतींअंतर्गत मनरेगा अंतर्गत कामे सुरू आहेत. त्यात वैयक्तिक सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, वैयक्तिक वृक्षलागवड, घरकुल बांधकाम आदी मिळून एकूण ३ हजार ९११ कामे सुरू आहेत.

MGNREGA Worker
MGNREGA Scheme : ‘मनरेगा’तून २७८० शेतकऱ्यांनी केली फळबाग लागवड

या कामांवर ४८ हजार १२८ अकुशल मजूर काम कर आहेत. त्यापैकी २९६ कामे आधार क्रमांकाशिवाय आहेत. एकूण ६ हजार १५७ मस्टर निघालेले आहेत. येत्या काळात मागणीनुसार जिल्ह्यातील उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू केली जातील.

परभणी जिल्हा मनरेगा सुरू कामे स्थिती

तालुका ग्रामपंचायती संख्या कामांची संख्या मजूर उपस्थिती

परभणी ८२ ४५६ ६५३७

जिंतूर १०० ५१३ ५३३५

सेलू ५९ ३३१ ५५८०

मानवत ४० ३६४ ४५४६

पाथरी ६ १२ ३०२

सोनपेठ २९ १३१ २०८८

गंगाखेड ६३ ४०३ ४०२८

पालम २४ ७३ १०८४

पूर्णा ७४ १६२८ १८६०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com