MGNREGA Wages : रोजगार हमी योजनेचे मजुरीदर आता २९७ रुपये

Employment Guarantee Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत महाराष्ट्रात यापुढे प्रतिदिन २९७ रुपये मजुरीदर देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
Employment Guarantee
Employment Guarantee Agrowon

Pune News : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत महाराष्ट्रात यापुढे प्रतिदिन २९७ रुपये मजुरीदर देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे फळबागांवरील कामांसाठी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन २४ रुपये जास्त मिळणार आहेत.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने बुधवारी (ता. २७) अधिसूचना काढून देशातील नवे मजुरीदर घोषित केले. रोजगार हमीवर कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या मजुरीचे सर्वांत जास्त दर आता हरियानाचे असून, ते प्रतिदिन ३७४ रुपये असतील. सर्वांत कमी दर पंजाबचे असून ते प्रतिदिन २२२ रुपये आहेत.

Employment Guarantee
MGNREGA : नांदेडला मजुरांना आधार प्रणालीनुसार मंजुरी

नवे दर येत्या एक एप्रिलपासून दिले जातील, असे केंद्रीय ग्रामविकास विभागाचे सहसचिव अमित कटारिया यांनी एका पत्रात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांचा विचार करता ‘रोहयो’चे नवे मजुरीदर गुजरातसाठी २८० रुपये, तर कर्नाटक ३४९ रुपये, मध्य प्रदेश २४३ रुपये, तेलंगणा ३०० रुपये, तसेच गोव्यात प्रतिदिन ३५६ रुपये असतील.

Employment Guarantee
MGNREGA Worker : ‘मनरेगा’च्या कामांवर ४८ हजारांवर मजूर

दरम्यान, राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सांगितले, की केंद्राच्या निर्णयामुळे रोजगार हमी योजनेच्या अखत्यारीत राज्यात होणाऱ्या नव्या फळबाग लागवडीला चालना मिळणार आहे. एक एप्रिलपासून फळबागांमधील होणाऱ्या सर्व अकुशल कामांचे मजुरीदर प्रतिदिन २४ रुपयांनी वाढवले जातील. सध्या प्रतिदिन २७३ रुपये मजुरीदराने बिले अदा केली जात आहेत.

नवी लागवड ६० हजार हेक्टरपर्यंत शक्य

रोजगार हमी योजनेतून राज्यात होणारी नवी फळबाग लागवड यंदा चांगला पाऊस झाल्यास ६० हजार हेक्टरच्या आसपास राहू शकते. चालू हंगामात लागवड उद्दिष्ट ५५ हजार हेक्टर होते; पावसाने साथ दिल्यास लागवड ६० हजार हेक्टरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज फलोत्पादन विभागाचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com