Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम?, कर्मचारी पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

Buldana Crop Damage : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राज्याच्या विविध भागासह बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा भागाला पावसाने झोडपले. यामुळे येथे शेतीचे मोठे नुकसान झाले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने कहर केला. अनेक भागात अतिवृष्टीसह तुफानी पाऊसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अशातच पीकविमा कंपनीचे कर्मचारी पैसे घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही? असा सवाल सिंदखेडराजा मधील नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी शेतजमीनदेखील खरडून गेली. तर येथे सोयाबीन, कापूस, तूर, मका, उडीद, मूग यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर कृषी आणि महसूल विभागाने समन्वय ठेवून लवकर पंचनामे करावेत असा आदेश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तसेच जिल्ह्यातला एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्याही सूचना केंद्रीय मंत्री जाधव यांनी दिल्या.

त्याप्रमाणे कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्याचबरोबर आता पीक विमाकंपन्यांकडून देखील पंचनामे केले जात आहेत. मात्र यावेळी आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लूटण्याचे काम पीकविमा कर्मचारी करत असल्याचे समोर आले आहे.

सिंदखेडराजा येथे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पीकविमा कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे मागत आहेत. तर कर्मचारी शेतकऱ्यांकडून २०० ते ३०० रूपयांची मागणी करत असल्याचा आरोप देखील सिंदखेडराजा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. तर कर्मचारी पैसै घेत असल्याचाही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे.

प्राथमिक अहवालात सिंदखेडाराजात नुकसान नाही

बुलढाणा, चिखली, खामगाव, नांदुरा, मेहकर, लोणार, शेगाव, मोताळा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. मात्र याच प्राथमिक अहवालात सिंदखेडाराजा तालुक्यात पावसामुळे काहीच नुकसान झाले नसल्याचेही विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आता नक्की शासनाने कसा पंचनामे केला असाही सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

Cotton Crop Management: कपाशीच्या पातेगळच्या व्यवस्थापनासाठी उपाय

Dharashiv Rain : तीन दिवसांच्या पावसात सहाशे घरांची पडझड

SCROLL FOR NEXT