Dattatray Gawde Agrowon
ॲग्रो विशेष

Potato Crop : बटाटा पिकाबरोबर इतर पिकेही घेण्यावर भर द्यावा

Dr. Dattatray Gawde : रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती करण्याकडे लक्ष केंद्रित करावे,’’असे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी सांगितले.

Team Agrowon

Manchar News : ‘‘सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बटाटा शेती केली जाते. दिवसेंदिवस भांडवली खर्चामुळे व बदलत्या हवामानामुळे बटाटा पिकाचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे.

त्यामुळे बटाटा पिकासह इतर पिके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती करण्याकडे लक्ष केंद्रित करावे,’’असे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी सांगितले.

कुरवंडी (ता.आंबेगाव) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित कृषी मेळाव्यात गावडे बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज कोल्हे, उपसरपंच जितेंद्र

तोत्रे, विकास बारवे, दत्तात्रय तोत्रे, रूपेश भंगाळे, गंगाधर कोकिटकर, सुनील तोत्रे, जयराम तोत्रे, नंदराम वाघमारे व ग्रामविकास अधिकारी अशोक शेवाळे उपस्थित होते.

डॉ. गावडे म्हणाले, ‘‘सततच्या बदलत्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केल्यास शेतकऱ्याच्या घरात आर्थिक सुलभता निर्माण होईल.’’

या वेळी सहायक गटविकास अधिकारी मनोज कोल्हे, कृषी सहाय्यक सुशांत कराळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन रवींद्र तोत्रे यांनी व सुनील तोत्रे यांनी आभार यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT