Sugarcane Production Guidance
Sugarcane Production Guidance  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : ऊस उत्पादनवाढीसाठी बेणे निवड, प्रक्रियेला महत्त्व द्या

Team Agrowon

Solapur News : उसाची एकरी उत्पादकता वाढवायची असेल तर, ऊस बेणे निवड आणि बेणे प्रक्रियेला महत्त्व द्या, असे आवाहन सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे यांनी केले.

‘सकाळ ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त (Agrowon Anniversary) भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथे आयोजित ‘ॲग्रो संवाद’ कार्यक्रमात डॉ. तांबडे बोलत होते.

‘उसाचे एकरी शंभर टन उत्पादन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सरपंच चिदानंद कोटगुंडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी सोमनाथ हुलगे (बेंबळे), दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील, पोलीस पाटील अशोक मुकाणे, यारा फर्टिलायझर्स कंपनीचे शिवहार पिसुरे, ‘सकाळ’चे वितरण व्यवस्थापक राम गावडे, हणमंत पुजारी, बसवराज बगले, कृषी सहायक भारत फरताडे या वेळी उपस्थित होते. यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि. हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

डॉ. तांबडे म्हणाले, उसासाठी जमीन निवडताना विचार करा. त्यानुसार जमिनीचे व्यवस्थापन करायला हवे, साधी जमीन असेल तर त्यामध्ये जिप्समचा वापर करा, साधारण एकरी दीड टन जिप्सम टाका आणि चुनखडीयुक्त जमीन असेल तर गंधक वापरा, तेही साधारण पाचशे ते एक हजार किलोपर्यंत टाका.

ऊस लागवड करताना बेणे निवड आणि बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे. ती केलीच पाहिजे, त्यावरच उसाची उत्पादकता अवलंबून आहे. ऊस लागवड पट्टा पद्धतीने आणि एक डोळा पद्धतीने करा, दोन सरीमध्ये एक सरी सोडून द्या. त्यात आंतरपीकही घेता येते.

पण मूळात पट्टा पद्धतीमुळे उसाचे फुटवे जास्त मिळतात. ऊस वाढीसाठीही त्याचा फायदा होतो. एक डोळा पद्धतीत ऊसाची ऊगवण क्षमता ६५ टक्के तर दोन डोळे पद्धतीत ३५ टक्क्यांपर्यंत असते, असेही ते म्हणाले. या वेळी पाणी आणि खत व्यवस्थापनाची काही सूत्रेही त्यांनी सांगितली.

श्री. सोमनाथ हुलगे हे स्वतः उसाचे एकरी सव्वाशे टन उत्पादन घेतात. ते वापरत असलेले तंत्रज्ञान आणि त्यातील टिप्स त्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्या.

तालुका कृषी अधिकारी माळी यांनी ऊसासह ठिबक संच आणि अन्य शासनांच्या योजनांची माहिती दिली. यारा कंपनीचे पिसुरे यांनी यारा कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती दिली.

प्रास्ताविक ‘ॲग्रोवन’चे जिल्हा बातमीदार सुदर्शन सुतार यांनी केले. सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन’चे सिनियर एक्झिक्युटिव्ह संदेश कुलकर्णी यांनी केले. तर आभार ‘सकाळ’चे वितरण व्यवस्थापक राम गावडे यांनी मानले.

पेढे, गुलाबपुष्पाने शेतकऱ्यांचे स्वागत

‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला भंडारकवठेसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व शेतकऱ्यांचे गुलाबपुष्प आणि पेढे देऊन स्वागत करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT