Sugarcane Crushing : परभणी, हिंगोली जिल्ह्यात चवेचाळीस लाख टनांवर ऊस गाळप

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे यावर्षीचे (2022-23) गाळप हंगाम मार्च महिन्यातच आटोपले आहेत.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे यावर्षीचे (2022-23) गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) मार्च महिन्यातच आटोपले आहेत.

यंदा सर्व 12 साखर कारखान्यांनी एकूण 44 लाख 51 हजार 533 टन ऊस गाळप केले. एकूण 45 लाख 19 हजार 965 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

गतवर्षीच्या (2021-22) या दोन जिल्ह्यात 62 लाख 2 हजार 322 टन ऊस गाळप तर 64 लाख 86 हजार 558 क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. त्यातुलनेत यंदा या दोन जिल्ह्यात ऊस गाळपात 17 लाख 50 हजार टनांनी तर साखर उत्पादनात 19 लाख क्विंटलने घट झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व 7 खासगी साखर कारखान्यांनी 28 लाख 94 हजार 983 टन उसाचे गाळप केले. सरास 9.93 टक्के उताऱ्यांने एकूण 28 लाख 77 हजार 940 क्विंटल साखर उत्पादन घेतले.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing In Satara : सातारा जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप पूर्ण

गंगाखेड शुगर्सने सर्वाधिक 7 लाख 14 हजार 819 टन ऊस गाळप केले तर सर्वाधिक 11.81 टक्के साखर उतारा बळीराजा साखर कारखान्याचा आला आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील 6 कारखान्यांनी 40 लाख 53 हजार टन ऊस गाळप करून 42 लाख 20 हजार 288 टन साखर उत्पादन घेतले होते. त्यातुलनेत यंदा ऊस गाळपात 11 लाख टनांनी तर साखर उत्पादनात 13 लाख क्विंटलने घट झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील 3 सहकारी आणि 2 खासगी साखर कारखान्यांनी मिळून एकूण 15 लाख 55 हजार 550 टन उसाचे गाळप केले. सरासरी 10.55 टक्के उताऱ्याने 16 लाख 42 हजार 25 क्विंटल साखर उत्पादन घेतले.

पूर्णा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक 4 लाख 1 हजार 932 टन ऊस गाळप केले तसेच या कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक म्हणजे 11.48 टक्के आहे.

Sugarcane Crushing
SugarCane Trash : उसाचे पाचट न जाळता बनवा सेंद्रिय खत

गतवर्षी सर्व 5 कारखान्यांनी 21 लाख 48 हजार 407 टन उसाचे गाळप करून 22 लाख 66 हजार 270 क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. त्यातुलनेत यंदा ऊस गाळपात 5 लाख 91 हजार 857 टनांनी तर साखर उत्पादनात 6 लाख 24 हजार 145 क्विंटलने घट झाली आहे.

या दोन जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम 1 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर याकालावधीत सुरु झाले होत तर 28 फेब्रुवारी ते 27 मार्च या कालावधीत आटोपले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com