Orange Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Farming : संत्रा फळांचा दर्जा राखण्यावर भर

Orange Production : अमरावती जिल्ह्यातील पुसला (ता. वरुड) येथील स्वप्नील मांडळे यांनी बंधू पंकज यांच्या मदतीने संत्रा उत्पादनात हातखंडा तयार केला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Farmer Management :

शेतकरी नियोजन

पीक : संत्रा

शेतकरी नाव : स्वप्नील श्रीरामपंत मांडळे

गाव : पुसला, ता. वरुड, जि. अमरावती

एकूण शेती : साडेसहा एकर

एकूण संत्रा झाडे : १०००

अमरावती जिल्ह्यातील पुसला (ता. वरुड) येथील स्वप्नील मांडळे यांनी बंधू पंकज यांच्या मदतीने संत्रा उत्पादनात हातखंडा तयार केला आहे. मांडळे बंधू संत्रा बागेचे शास्त्रोस्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर भर देतात. बागेत संत्र्याची ७, १२ आणि १५ वर्षे वयाची सुमारे १००० झाडे आहेत. बागेत आंबिया आणि मृग असे दोन्ही बहर घेतले जातात. त्याकरिता शास्त्रोक्‍त पद्धतीने नियोजन केले जाते. बागेचे क्षेत्र महेंद्री राखीव वनक्षेत्रालगत असल्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर सर्वाधिक असतो. वन्य प्राण्यांपासून बागेचे संरक्षण आव्हानात्मक राहते. अशा परिस्थितीत त्यांनी बागेचे संरक्षण केले आहे.

बागेत सुमारे १००० झाडांची लागवडीची झाडे विविध वयांची आहेत. त्यापैकी ७ वर्षे वयाच्या ३०० झाडांची ८ बाय १० फूट, १२ वर्षे वयाच्या ३०० झाडांची १० बाय १० फूट आणि १५ वर्षे वयाच्या ४०० झाडांची १० बाय १० फूट अंतरावर लागवड आहे. सध्या आंबिया बहरातील बागेत दर्जेदार फळे लगडलेली आहेत. या पुढील काळात फळांचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्वप्नील सांगतात.

आंबिया बहर नियोजन

बहर धरण्यासाठी डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी देत ताण तोडला. साधारणपणे एक महिना बागेस ताण बसेल असे नियोजन केले जाते.

ताण तोडताना पहिले पाणी दांडाने दिले जाते. सुरुवातीच्या काळात कमी आणि त्यानंतर सिंचन वाढविले जाते.

या दरम्यान शेणखण, गांडूळ खत, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि १०ः२६ः२६ खताच्या मात्रा रिंग पद्धतीने झाडांना दिल्या जातात.

मार्च- एप्रिल महिन्यांत बागेस मुबलक पाणी देण्यास सुरुवात केली. या कालावधीत बाष्पीभवन रोखण्यासाठी बागेतील तण तसेच ठेवले जाते. तणामुळे ओलावा कायम राहतो, असे स्वप्नील सांगतात.

नवती फुटल्यानंतर रासायनिक कीटनाशके आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या.

फळे बोराच्या आकाराची झाल्यानंतर नत्र आणि पोटॅशचा वापर करण्यात आला.

जून महिन्यात पाऊस सुरू होण्यापूर्वी १०ः२६ः२६ आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला.

सिंचन व्यवस्थापन

बागेत सिंचनासाठी पाटपाणी आणि ठिबक अशा दोन्ही पद्धतीचा अंगीकार करण्यात आला आहे. पाटपाणी देताना झाडाच्या बुंध्याला पाणी लागणार नाही याची खबरदारी घेतली जाते. त्याकरिता झाडाभोवती रिंगण केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोडांना बोर्डो पेस्ट लावली आहे. जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखला जाईल.

उन्हाळ्याच्या दिवसांत बागेतील वाफसा स्थिती पाहून ठिबकद्वारे रात्रीच्या वेळी सिंचन करण्यावर भर देण्यात आला. पावसाळ्यामध्ये पाण्याचा सामू म्हणजे पीएच जास्त असतो. पीएच नियंत्रित करण्याकरिता उपाय केले जातात. त्यामुळे पाण्याचा सामू नियंत्रित होऊन फवारणीचा परिणाम चांगला मिळतो, असे स्वप्नील सांगतात.

मागील कामकाज

गेल्या दीड महिन्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला. फायटोप्थोरा बुरशीमुळे झाड

पिवळे पडून फळगळ होते. शिवाय फळांचे देठदेखील पिवळे पडतात. त्यासाठी ह्युमिक ॲसिड, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास यांचा वापर करण्यात आला.

बागेतील पावसाचे अतिरिक्त पाणी त्वरित बाहेर निघून जाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

पाऊस जास्त असल्यामुळे बागेत फळगळीची समस्या दिसून आली. त्यासाठी रासायनिक कीटकनाशकांसोबत जिब्रेलिक ॲसिड आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला आहे.

फळांचा दर्जा राखण्यासाठी पोटॅश आणि नत्राचा वापरावर भर देण्यात आला.

कोळशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्यात आला.

फळमाशीसाठी बागेत निळे-पिवळे सापळे लावले. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारण्या घेतल्या.

फळधारणा अवस्थेतील बागेत तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करण्यात आला.

आगामी नियोजन

सध्या बागेत मोठ्या आकाराची फळे लागलेली आहेत. आगामी काळात फळांचा दर्जा राखण्यावर भर दिला जाईल.

आवश्यकतेनुसार सिंचन केले जाईल. प्रमाणशीर सिंचनावर भर दिला जाईल.

बागेची पाहणी करून आवश्यकता भासल्यास रासायनिक फवारणीचे नियोजन आहे. कोळशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी घेणार आहे.

साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटी ते नोव्हेंबरमध्ये फळ तोडणीस सुरुवात होईल. विक्रीसाठी संपूर्ण बाग व्यापाऱ्यांना देण्याचे नियोजन असते.

स्वप्नील मांडळे, ९४२१८२४४२८

(शब्दांकन : विनोद इंगोले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT