Elephant Rampage Agrowon
ॲग्रो विशेष

मोर्लेत हत्तींचा धुडगूस, शेतीचे मोठे नुकसान

जिल्ह्यातील मोर्ले (ता. दोडामार्ग) या गावात स्थिरावलेल्या हत्तींच्या कळपाने धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील मोर्ले (ता. दोडामार्ग) या गावात स्थिरावलेल्या हत्तींच्या कळपाने धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस हत्तींकडून शेती-बागायतींचे नुकसान सुरू असून, रात्रीच्या वेळी कळप लोकवस्तीत येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोडामार्ग तिलारी खोऱ्यात हत्तीचे वास्तव्य असते. येथील हत्तीचा कळप काही दिवसांपूर्वी मोर्लेत आला. तेथून पुन्हा तो केर येथे दाखल झाला होता. परंतु दोन दिवसांपूर्वी पुन्हा हा कळप मोर्लेत दाखल झाला आहे. मोर्लेत आलेल्या पाच हत्तींच्या कळपाने शेती, बागायतीचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे.

केळी, माड, बांबू आदींचे मोठे नुकसान हत्तींकडून होत आहे. शेतकरी संतोष मोर्ये, गोपाळ गवस, रमाकांत गवस, विठ्ठल गवस यांच्या शेतीचे नुकसान आतापर्यंत हत्तींनी केले आहे. दिवसभर हत्ती जंगलात आणि रात्री वस्तीत येत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काजू बागांमध्ये अजूनही बी गोळा करण्याचे काम सुरू आहे. परंतु हत्तींच्या वावरामुळे काजू बागेत जाण्यास कामगारांकडून नकार दिला जात आहे. दरम्यान, हत्तींना हुसकावण्यासाठी फटाक्यांचा वापर केल्यामुळे टस्कर अधिक आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gopinath Munde Scheme: सुरक्षा योजनेत शेतकरीच असुरक्षित

Tourism Development: पर्यटन विकास योजनेतून वेळागरमधील जमीन वगळा

Irrigation Issue: ‘पालखेड’च्या काँक्रिटीकरणास तीव्र विरोध

Water Scheme Crisis: अकोट ८४ गावे पाणीपुरवठा योजनेवरील संकट लांबणीवर

Rabi Sowing: तेवीस लाख ४२ हजार हेक्टरवर रब्बी पेरा

SCROLL FOR NEXT